शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सीईओ तुमचा ठेकेदारांवर भरवसा नाय काय, नाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 18:22 IST

नाशिक : जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था यांनी धनादेश वठत नसल्याच्या निषेर्धात आक्र मक भूमिका घेत मंगळवारपासून (दि.२२) बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. ‘सीईओ तुझा ठेकेदारांवर भरवसा नाही काय’ असे गाणे सादर करत धनादेशाचे पैसे मिळालेच पाहिजे, अशा घोषणाबाजी ठेकेदारांनी यावेळी केली. दरम्यान, जि. प. ठेकेदार ...

नाशिक : जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था यांनी धनादेश वठत नसल्याच्या निषेर्धात आक्र मक भूमिका घेत मंगळवारपासून (दि.२२) बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. ‘सीईओ तुझा ठेकेदारांवर भरवसा नाही काय’ असे गाणे सादर करत धनादेशाचे पैसे मिळालेच पाहिजे, अशा घोषणाबाजी ठेकेदारांनी यावेळी केली. दरम्यान, जि. प. ठेकेदार संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. सकाळी सुरू झालेल्या या आंदोलनात ठेकेदारांनी निर्देशने केली. यावेळी संतप्त झालेल्या ठेकेदारांनी संघर्ष, धनादेश लिहिलेल्या टोप्या परिधान केलेल्या होत्या. आजवर झालेल्या बैठकांमधून ठेकेदारांच्या बिलाची रक्कम ३० जून २०१७ पर्यंत अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले गेले. मात्र, आजतागत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ठेकेदार मानसिक व आर्थिक तणावात असल्याचे सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे कोषाध्यक्ष विनायक माळेकर यांनी सांगितले. प्रशासनाने ठेकेदारांच्या धनादेशबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास जि. प. च्या विकासकामांमध्ये ठेकेदार सहभागी होणार नाही.