शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

जबाबदारी झटकण्यावरून सीईओंना धरले धारेवर

By admin | Updated: July 5, 2017 23:48 IST

सदस्यांचा संताप : वागणूक बदलण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषद सदस्यांशी बोलण्याची पद्धत, त्यांना देण्यात येणारी अवमानजनक वागणूक, या कारणांवरून बुधवारी (दि. ५) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी सर्वपक्षीय सदस्यांनी धारेवर धरले. नाही मान सन्मान तर किमान चहा-पाणी तरी विचारले तर चालेल, कामकाज करण्याची पद्धत सुधारा अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा निर्वाणीचा इशाराही बैठकीत देण्यात आला.येवल्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांवरून संजय बनकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी कोणी इच्छुक असेल, तर नावे सांगा, आपण बदली करतो, असे दीपककुमार मीना यांनी सांगताच सदस्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. खातेप्रमुखांचे प्रमुख म्हणून तुम्हाला असे बोलणे शोभत नाही. जबाबदारी झटकू नका, असे डॉ. भारती पवार व नीलेश केदार यांनी मीना यांना सुनावले. त्याचवेळी बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार आपण गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे दीपककुमार मीना यांनी सांगितले. तुम्हाला भेटायचीही सदस्यांना परवानगी घ्यावी लागते, असा आरोप डॉ. भारती पवार व हिरामण खोसकर यांनी केला. तर सदस्यांना तुम्ही महत्त्व देत नाही, त्यांचा अवमान करता,असा आरोप बाळासाहेब क्षीरसागर यांनी केला. तर डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी सदस्यांमध्ये आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये अंतर वाढल्याची खंत व्यक्त केली. नीलेश केदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कामकाजाची पद्धत सुधारण्याची सूचना केली. सदस्य आल्यावर त्यांना चहा सोडा, साधे पाणी विचारण्याचेही सौजन्य दीपककुमार मीना दाखवित नसल्याचे सांगत सिन्नरला रिक्त पदांचा प्रश्न दोन दिवसात सुटला नाही तर ‘आप का और मेरा झंझट होगा’ असा इशारा दिला.पेपर में दुनियाभरकी खबरेखातेप्रमुखांकडून तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर माहिती मागविता, त्यावरच बैठकींचा निरोप देता, हे खरे आहे काय? याबाबत वृत्तपत्रात बातम्याही आल्या आहेत, याकडे डॉ. भारती पवार यांनी दीपककुमार मीना यांचे लक्ष वेधले. त्यावेळी ‘पेपर में दुनियाभरकी न्यूज आती है’ मीना यांनी सांगताच सभागृह अवाक् झाले. यामुळे सदस्यांना सन्मानाची वागणूक द्या, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दीपककुमार मीना यांना दिले.