शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

प्रलंबित कामांबाबत सीईओ घेणार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:43 IST

नाशिक : जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कामांची दिरंगाई आणि नियोजनाचा अभाव सातत्याने समोर आल्यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची हजेरी घेण्यास सुरुवात केली आहे. येथील विविध विभागात कामांना दिरंगाई होत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी कामे पूर्णत्वासाठी वेळापत्रकच आखून दिले असून, त्यानुसार कामकाजाची त्यांना अपेक्षा आहे. यासाठी ते आता अचानक विभागांना भेटी देणार आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : बांधकाम विभागापासून केली सुरुवात

नाशिक : जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कामांची दिरंगाई आणि नियोजनाचा अभाव सातत्याने समोर आल्यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची हजेरी घेण्यास सुरुवात केली आहे. येथील विविध विभागात कामांना दिरंगाई होत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी कामे पूर्णत्वासाठी वेळापत्रकच आखून दिले असून, त्यानुसार कामकाजाची त्यांना अपेक्षा आहे. यासाठी ते आता अचानक विभागांना भेटी देणार आहेत.जिल्हा परिषदेतील कामांना गती यावी यासाठी करण्यात आलेल्या अनेक उपाययोजनांतर्गत गिते यांनी कामांचे नियोजन केले असून, फाईल्सची गतीदेखील वाढविली आहे; मात्र विभागप्रमुख आणि कर्मचाºयांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कामांना विनाकारण विलंब होत असल्याचे अनेक प्रकार समोर आल्यानंतर आता गिते यांनी याकामी अधिकारी, कर्मचाºयांना कामकाजाची दिशा ठरवून दिली आहे. या संदर्भात त्यांनी नुकतान ई-निविदेबाबतही आढावा घेतला.जिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघु पाटबंधारे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत करण्यात येणारी कामे विहित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सर्व विभागांना वेळापत्रक तयार करून देणेत आले आहे. वेळापत्रकानुसारच यापुढे प्रत्येक निविदा कामाचा आढावा होणार असून, आचारसंहितेपूर्वी सर्व विभागांनी निविदा प्रक्रि या पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. सदरचे काम विहित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी गिते यांनी विविध विभागांचा दैनंदिन आढावा घेण्यास सुरु वात केली असून, सकाळी त्यांनी विविध विभागात भेटी देऊन कामाचा आढावा घेतला.बांधकाम दोन विभागातील सुनील जाधव व प्रशांत पगारे यांचेकडील कामकाजाची तपासणी करून प्रलंबित कामांबाबत माहिती घेऊन सूचना दिल्या. यापुढेही विविध विभागात भेटी देऊन कर्मचाºयांच्या कामाचा आढावा घेणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांनादेखील सूचना केल्या असून, निवडणूक आचारसंहितेपूर्वी कार्यारंभ आदेशाबाबत कामात गती देण्याच्याही सूचना केल्या आहेत. प्रलंबित कामांचा आढावाई-निविदेच्या कामाबाबत सर्व संबंधित कर्मचाºयांचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आता संबंधित विभागांना भेटी देऊन कर्मचाºयांचा आढावा घेण्यास सुरु वात केली आहे. गिते यांनी बुधवारी (दि.१६) रोजी बांधकाम विभागांना भेटी देऊन प्रलंबित कामांचा आढावा घेऊन विहित वेळेत काम करण्याचे निर्देश दिले.