शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माणकेश्वर वाचनालयाची शताब्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 18:26 IST

निफाड : शतकपुर्तीनिमित्त विविध उपक्रम

ठळक मुद्देग्रंथालयाने अनेक स्पर्धा परीक्षांसाठी मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयपूर्तीपर्यंत नेऊन पोहोचविले

लासलगाव : निफाड येथील माणकेश्वर वाचनालय ९ जुलै २०१९ रोजी शताब्दी साजरी करत आहे. संस्थापक चिंतामणराव गाडगीळ, विष्णुपंत सोनवणी, भाऊसाहेब उगावकर यांच्या कर्तव्यपूर्तीचे हे जागृत ग्रामदैवत एक मनोहारी वेदालय म्हणून नावारुपाला आले आहे. शताब्दीपूर्तीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. ९ जुलै १९१९ रोजी निफाड तालुक्याच्या गावी ब्रिटीशांच्या पिळवणुकीला कंटाळून लोकांच्या आग्रहास्तव या सरस्वतीच्या मंदिराची स्थापना केली गेली. कोलकाताच्या राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानयांच्या प्रेरणेने व बहुमोलाच्या आर्थिक सहकार्याने माणकेश्वर वाचनालयाची नूतन वास्तू न्या.महादेव गोविंद रानडे यांच्या जन्मस्थळी डौलाने उभी आहे. वाचनालयास २००५ मध्ये राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट ग्रंथालय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. याशिवाय ग्रंथालयाचे ग्रंथपाल बाळासाहेब खालकर यांना महाराष्ट्र शासनाचा २०१४-१५ चा उत्कृष्ट ग्रंथमित्र पुरस्कार मिळाल्याने आदर्श व्यवस्थापनाचाही नावलौकिक वाढला. ग्रंथालयाने अनेक स्पर्धा परीक्षांसाठी मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयपूर्तीपर्यंत नेऊन पोहोचविले. उपविभागीय संजय बागडे, विक्र ीकर अधिकारी महेंद्र शिंदे, किनवटचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, रेल्वे अधिकारी मिलींद गायकवाड वाचनालयाचे हे आजीव सभासद आहेत. माणकेश्वर वाचनालयाचा यशोगाथा पुढे चालू ठेवण्यात अध्यक्ष दत्ता उगावकर, मधुकर बाजीराव शेलार यांचेसह संचालकमंडळाचे मोठे योगदान राहिले आहे. दानशूर समाजसेवक व न्या. महादेव रानडे यांच्या पणतू व पणती श्री. आर.एम. विव्दांस व वसुधाताई आपटे यांनी आजीवर भरीव आर्थिक मदत वाचनालयास केली आहे. वाचनालयाच्या शताब्दीपूर्तीनिमित्त वाचनालयाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मनोहरी वेदालयमाणकेश्वर वाचनालय हे एक जाज्वल व मनोहरी वेदालय आहे, जेथे स्वरूप आहे पण ते निर्गूण आहे, अक्षरत्व आहे पण जडत्व नाही, उत्कर्ष आहे पण ईर्षा नाही, ओढ आहे पण स्वार्थ नाही. या वाचनालयाने अनेक पिढ्या घडविल्या आहेत आणि तेच संचित आहे.- डॉ. मेघा बाळलींग जंगम, लोकसाहित्य अभ्यासक

टॅग्स :Nashikनाशिक