शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा प्रश्नांबाबत केंद्राचे निर्णय शेतकऱ्यांसाठी अडचणीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:09 IST

लासलगाव : केंद्र सरकारने कांदा प्रश्नांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गात मोठी नाराजी आहे. काही दिवसांपासून कांद्याचे लिलाव देखील बंद आहेत याचा थेट परिणाम हा कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर होत असतो. कांद्याच्या प्रश्नांबाबत भारत सरकारच्या वतीने जे निर्णय घेण्यात येत आहेत ते महाराष्ट्र व इतर राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीचं ठरत आहेत असे मत अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देछगन भुजबळ : शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याची टिका

लासलगाव : केंद्र सरकारने कांदा प्रश्नांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गात मोठी नाराजी आहे. काही दिवसांपासून कांद्याचे लिलाव देखील बंद आहेत याचा थेट परिणाम हा कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर होत असतो. कांद्याच्या प्रश्नांबाबत भारत सरकारच्या वतीने जे निर्णय घेण्यात येत आहेत ते महाराष्ट्र व इतर राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीचं ठरत आहेत असे मत अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

कधीतरी आता शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या कांद्याला चांगले भाव मिळायला सुरवात झाली तर नियम आणि अटी टाकून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याची टिका छगन भुजबळ यांनी केली आहे.कांदा उत्पादन करणारा शेतकरी हा अतिशय गरीब असतो, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव हा कधीतरी मिळतो पण भाव खाली आला तर मात्र कांदा अगदी फेकून द्यावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभावाचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा सवाल करून ते म्हणाले की,मधल्या काळात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवल होते आता सर्व बाजारपेठा चालू झाल्या असताना सुरवातीला केंद्राने निर्यात बंदी आणली त्यानंतर इराण आणि पाकिस्तानचा कांदा भारतात आणला कांद्याच्या व्यापाऱ्यांवर अनेक ठिकाणी इन्कम टॅक्सच्या धाडी टाकण्यात आल्या.त्यानंतर कांदा साठवणुकीला मर्यादा आणण्यात आल्या अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.कांद्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा. शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार