शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाकडून शहरातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:33 IST

देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्र ठरले असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय वैद्यकीय पथकाने शुक्रवारी सकाळपासून आडगाव मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालय तसेच झाकीर हुसेन हॉस्पिटलला प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. केंद्रीय वैद्यकीय विभागाचे सहसंचालक डॉ. पुष्पेंद्र वर्मा आणि सहायक संचालक डॉ. साहिल गोयल यांना मनपा प्रशासन, जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमधील उपलब्ध सुविधा आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. 

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेजला भेट

नाशिक: देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्र ठरले असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय वैद्यकीय पथकाने शुक्रवारी सकाळपासून आडगाव मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालय तसेच झाकीर हुसेन हॉस्पिटलला प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. केंद्रीय वैद्यकीय विभागाचे सहसंचालक डॉ. पुष्पेंद्र वर्मा आणि सहायक संचालक डॉ. साहिल गोयल यांना मनपा प्रशासन, जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमधील उपलब्ध सुविधा आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. या केंद्रीय वैद्यकीय पथकाने गुरुवारी सायंकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला होता. त्यावेळी शहरात ऑक्सिजन बेडअभावी होणारे रुग्णांचे हाल, व्हेंटिलेटरचा तुटवडा, रेमडेसिवीरची उणीव अशा सर्व बाबींवर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्याची माहिती घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळीच या वैद्यकीय पथकाने आडगाव मेडीकल कॉलेजमधील कोरोना केंद्र, तेथील लॅबोरेटरीला भेट देऊन त्यांची कार्यपद्धती जाणून घेतली. रेकॉर्ड्स, स्वॅब कुठे कसे ठेवले जातात, त्याबाबतच्या माहितीचाही आढावा कॉलेजच्या डीन डॉ. मृणाल पाटील यांच्याकडून घेतला. सिव्हिलच्या कोरोना लॅबची पाहणी मेडीकल कॉलेजनंतर या पथकाने जिल्हा रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी पथकाने जिल्हा रुग्णालयाचा कोरोना विभाग, कोविड सॅम्पलिंग लॅबोरेटरी अशा सर्व स्थानांना भेट देऊन तेथील कामकाजाची पद्धती जाणून घेतली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील कामकाजाचे पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनदेखील त्यांनी बघितले. नूतन तसेच रुग्णालयातील बाधितांच्या नातेवाईकांशी चर्चा करुन त्यांची मतेदेखील या पथकाने जाणून घेतली. त्यानंतर पथकाने महापालिकेला भेट देऊन मनपा आयुक्त कैलास जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे तसेच नोडल ऑफीसर डॉ. आवेश पलोड यांच्याशी देखील चर्चा केली.फळविक्रेत्याची केली तपासणी आडगाव मेडिकल कॉलेजवरुन परतताना संबंधित पथकाने मुंबई नाक्याजवळ उतरुन अचानकपणे तेथील फळविक्रेत्यांची पाहणी करुन मास्क लावले आहेत की नाही, त्याची तपासणी केली. तसेच एका विक्रेत्याचा मास्क नाकापासून खाली आलेला असल्याने त्याला मास्क व्यवस्थित लावण्यास सांगितले. त्याशिवाय सायंकाळी त्यांनी त्रिमुर्ती चौकातील भाजीबाजाराचीदेखील पाहणी केली. गोविंदनगर कन्टेन्मेंट झोनला भेट या पथकाने शहरात नुकतेच मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडलेल्या गोविंदनगरच्या कंटेन्मेंट झोनला भेट दिली. या भेटीदरम्यान पथकाने बाधित नागरिकांशी चर्चा,  मनपाने केलेल्या नोंदी या सर्व बाबींची पडताळणी केली. तसेच मनपाकडून किती वेळा औषध फवारणी, धुरळा फवारणी झाली याबाबतदेखील पथकाने कसून चौकशी करीत त्याच्या नोंदी करुन घेतल्या. 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य