शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’चा प्रस्ताव; निधीची मागणी : १५ कोटी खर्च अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:32 IST

नाशिक : सिडकोतील बहुचर्चित पेलिकन पार्कच्या जागेबाबत न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश नसल्याने पार्कची जागा विकसित करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने त्याकरिता शासनाकडे निधी मिळविण्यासाठी आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला आहे.

ठळक मुद्दे पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’चा प्रस्ताव;निधीची मागणी : १५ कोटी खर्च अपेक्षित

नाशिक : सिडकोतील बहुचर्चित पेलिकन पार्कच्या जागेबाबत न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश नसल्याने पार्कची जागा विकसित करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने त्याकरिता शासनाकडे निधी मिळविण्यासाठी आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला आहे.शनिवारी (दि.२) विधी समितीच्या सभेत मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी पेलिकन पार्कबाबत प्रश्न उपस्थित केला असता, विधी विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनी सांगितले, पेलिकन पार्कचे ठेकेदार पूना अ‍ॅम्युझमेंटने महापालिकेविरुद्ध जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता.परंतु, सदर निकाल महापालिकेच्या बाजूने लागला. त्यानंतर ठेकेदाराने पुन्हा वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले परंतु, तेथेही मनपाच्याच बाजूने कौल मिळाला. ठेकेदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली परंतु, न्यायालयाने अपील दाखल करून घेताना कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे पेलिकन पार्कची जागा महापालिका विकसित करू शकते. त्यावर सलीम शेख यांनी सदर जागेत नागरिकांना सोयी-सुविधा पुरविणारा प्रकल्प उभारण्याची सूचना केली. दरम्यान, पेलिकन पार्कच्या जागेचा तिढा सुटल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने त्याठिकाणी ‘सेंट्रल पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्याठिकाणी मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात याकरिता शासनाकडे निधीची मागणी केलेली आहे. तसा प्रस्ताव नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी शासनाकडे दिलेला असून, निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. सदर पार्कसाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सेंट्रल पार्कमध्ये काय सेंट्रल पार्कमध्ये प्रामुख्याने जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक तसेच लहान मुले व ज्येष्ठांसाठी स्वतंत्र उद्यान यासाठी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आमदार सीमा हिरे यांनी यापूर्वीच सदर जागेवर ‘नमो उद्यान’ विकसित करण्याचा संकल्प सोडलेला आहे.