शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मध्य नाशिक : पारंपरिक आडाख्यांपेक्षा सुशिक्षित मतदानच निर्णायकमतदारांना गृहीत धरणे पडले महागात

By admin | Updated: October 30, 2014 00:11 IST

मध्य नाशिक : पारंपरिक आडाख्यांपेक्षा सुशिक्षित मतदानच निर्णायकमतदारांना गृहीत धरणे पडले महागात

नाशिक : सारेच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असल्याने आपली ताकद आजमावण्याची साऱ्याच उमेदवारांना संधी देणाऱ्या मध्य नाशिक मतदारसंघात सारेच पारंपरिक आडाखे चुकवले आणि अर्थकारणाच्या जोरावर विशिष्ट मतांची बेगमी करणाऱ्या उमेदवारांना धडा शिकवतानाच, मतदारांना कोणी गृहीत धरू शकत नाही, हेही या मतदारांनी सिद्ध केले. मध्य नाशिक मतदारसंघात मतदारांचीच दोन भागांत विभागणी करून आपल्या विजयाचे गणित मांडण्याचा प्रयत्न या निवडणुकीतील बहुसंख्य उमेदवारांनी केला होता. त्याआधारे विशिष्ट मतांकडेच लक्ष केंद्रित केले होते; परंतु या मतदारसंघात उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची केंद्रनिहाय आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर उच्चभ्रू मतदार हा निर्णायक ठरू शकत नाही असे आजवर मानणाऱ्या उमेदवारांना या मतदारांनी निर्णय फिरवण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिलेच; परंतु जी मते आपल्या ताकदीने कुठेही फिरवू शकतो अशा मुखंडांनादेखील मतदारांनी तोंडघशी पाडले. राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून ज्या मतदारांनी पाच वर्षांपूर्वी मनसेला साथ दिली, त्याच मतदारांनी मनसेचे प्रभाव क्षेत्र असलेल्या सर्वच भागांत या पक्षाला नाकारले. अव्वल क्रमांक दूरच; परंतु दुसऱ्या क्रमाकांसाठीही गिते यांना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या उमेदवारांनी झुंजवले यातच सारे आले. ज्या भागात भाजपाला साथ मिळणारच नाही असे समजले जात होते, तेथेही भाजपाला मतदान झाल्याने मतदारांचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. पक्षांतर्गत राजी- नाराजी, बलस्थाने या उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात हे खरे असले, तरी या सर्वांपलीकडे निवडणुकीत कोणता निकाल द्यायचा हे मतदारच ठरवित असतो आणि तेच स्पष्ट करणारा हा निकाल ठरला आहे. (प्रतिनिधी)