शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद : सेंट्रल किचनच्या ठेकेदारांचे बील देण्याची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 19:04 IST

कामातील त्रुटी लक्षात घेऊन बिले रोखण्याची कार्यवाही अपेक्षीत असताना येथे मात्र प्रशासन बिल देण्याची घाई का करीत आहे, असा प्रश्न अजय बोरस्ते यांनी केला आहे.

ठळक मुद्देअजय बोरस्ते यांनी घेतला आक्षेप

नाशिक :   शहरातील प्राथमिक शाळेतील सुमारे सव्वा लाख मुलांना शालेय पोषण आहार देण्यासाठी सेंट्रल किचनचे तेरा ठेके रद्द करण्यात आले आहेत. आता नव्याने ठेका देण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच त्याला शासनाने आक्षेपघेतला. लगोलग प्रशासनाने देखील जुन्या ठेकेदारांची बील तातडीने अदा करण्यासाठी मुख्यध्यापकांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात महापालिकेतील विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी आक्षेपघेतला असून ही सर्व प्रक्रियाच संशयास्पद असल्याचा त्यांचा आरोप आहे. महापालिकेने गेल्यावर्षी सेंट्रलचे किचनचे ठेके दिल्यानंतर त्यात अनेक प्रकारची अनियमीता असल्याचा नगरसेवकांचा आरोप होता. इतकेच नव्हे तर शाळांना पोषण आहार देताना देखील त्यात मोठा गैरव्यवहार आणि अनियमीतता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सदरचे ठेके रद्द करतानाच या सर्व प्रकाराची चौकशी झाल्याशिवाय ठेकेदांरांची देयके अदा करू नका अशी मागणीमहासभेत करून तसा ठरावही करण्यात आला होता. दरम्यान, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपल्या स्तरावर या प्रकरणाची चौकशी करून सेंट्रल किचनला अचानक भेटी देण्यासाठी पथके पाठवली. यावेळी अनेक प्रकारची अनियमितता आढळून आली. त्यामुळे आयुक्तांनी ठेके रद्द केले आहेत. आता आयुक्तांनी नव्याने प्रक्रिया राबविण्यासाठी कार्यवाही सुरू केली असताना कॉँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी नव्याने निविदा काढण्यास स्थगिती आणली. त्यातून वाद सुरू होत नाही तोच आता महापालिकेच्या प्रशासनाने संबंधीत ठेकेदारांना देयके देण्यासाठी मुख्यध्यापकांना पत्र पाठविले आहे सदरच्या ठेकेदारांनी काम योग्य पध्दतीने केलेले नाही. त्यातच कामातीलत्रुटी लक्षात घेऊन बिले रोखण्याची कार्यवाही अपेक्षीत असताना येथे मात्र प्रशासन बिल देण्याची घाई का करीत आहे, असा प्रश्न अजय बोरस्ते यांनी केला आहे. केवळ देयके देण्यातच नव्हे तर एकुणच निविदा काढण्यापासून आणिचौकशी करण्यापर्यंत सर्वच बाबी संशयास्पद असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाfoodअन्न