शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कृषी समिती तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर; ६ ते ९ फेब्रुवारीला नाशिक, पुणे, बीड जिल्ह्यात पाहणी

By दिनेश पाठक | Updated: February 2, 2024 21:56 IST

कांदा पिकाचा घेणार आढावा

नाशिक : केंद्रीय कृषी समिती ६ व ७ फेब्रुवारी असे दोन दिवस नाशिक तर दि. ८ व ९ राेजी पुणे व बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. ऑक्टाेंबरच्या अखेरीस व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात  झालेल्या अवकाळी  पावसानंतर  केंद्रीय  समिती  तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर येत आहे. कांद्याचे पडलेले भाव, सध्याचा पाण्याचा सोर्स याचा आढावा समिती घेईल. भारत सरकारच्या कृषी विभागाचे उपसंचालक  पंकजकुमार यांच्या मार्गदर्शनाखालील चार सदस्यीय समिती कृषी आढावा घेईल.

दरम्यान, ७ नोव्हेंबर २०२३ ला केंद्रीय कृषी समिती नुकसानीच्या पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आली हाेती. त्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही समितीने नाशिक, जळगाव, पुणे व अन्य नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता. या दोन दाैऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी फार काही पडले असेही नाही. किंवा पिक विमा भरपाईचा लाभही परिपूर्ण मिळाला  नाही.  त्यातच  शेतकऱ्यांनी समितीसमोर रोष व्यक्त करून देखील कांदा निर्यातबंदी हटविली गेली नाही. त्यामुळे समितीच्या तिसऱ्या दाैऱ्यात काय हाती पडणार? की समिती आपला सोपस्कार पूर्ण करणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. कांदा उत्पादकांचे समितीसमोर आव्हान

केंद्रीय अर्थसंकल्पात कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे हाेईल किंवा हमी भाव मिळेल, अशी आशा कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होती. परंतू तसे न झाल्याने कांदा उत्पादकांनी पुन्हा आंदोलनाचा  इशारा दिला  आहे ृाअशातच केंद्रीय समिती परत एकदा दोन दिवस नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने समितीला संतप्त शेतकऱ्यांचा रोष सहन करावा लागू शकतो. त्यातून समिती काय तोडगा काढणार? हे पाहणे देखील महत्वाचे ठरेल. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने ३२ हजार ८३२ हेक्टरवर नुकसान झाले होते. तर १० हजार ४०० हेक्टरवर फक्त कांदा पिकाला झळ बसली होती.