लासलगाव : साठवणूक होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्यावतीने आता आयात होणाऱ्या कांद्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. ही अधिसुचना केंद्र सरकारच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत विशेषाधिकार वापरत आता आयात केलेल्या कांदा होलसेल अगर ठोक विक्र ेता आता जास्तीत जास्त २५ मेट्रिक टन तर किरकोळ कांदा व्यापारी केवळ ५ मेट्रिक टन कांदा साठवणुक करतील, तशी मर्यादा घालण्यात आली आहे. तसे राजपत्रही प्रसिद्ध झाले असुन खाद्य आणि अन्न वितरण मंत्रालयाच्या वतीने वरिष्ठ आर्थिक सल्लागार रोहीतकुमार परमार यांच्या स्वाक्षरीने हे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.त्यामुळे आता ठोक अगर किरकोळ कांदा विक्र ेत्याने मर्यादेपेक्षा अधिक साठा ठेवला तर विशेष पथक तातडीने कारवाई करणार आहे.केंद्र सरकारने इजिप्त आणि तुर्की या दोन देशातून आता १७ हजार मेट्रिक टनाऐवजी कांद्याची वाढीव गरज लक्षात घेऊन २१ हजार मेट्रीक टन कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
केंद्राचे आता आयात कांद्यावर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 14:51 IST