शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 22:47 IST

त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तयार असलेल्या अन्नपूर्णामाता मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी येथे शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञास रविवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने गावातून शोभायात्रा काढण्यात आली होती. आश्रमापासून निघालेली शोभायात्रा संत निवृत्तिनाथ रोड, तेली गल्ली, भगवती चौक, बोहोरपट्टी, लक्ष्मीनारायण चौकमार्गे मेनरोडने कुशावर्तावर नेऊन धार्मिक पूजाविधी पार पाडून शोभायात्रा पुनश्च आश्रमात आणण्यात आली. यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी यांचे सुवासिनींनी औक्षण केले.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : शोभायात्रेत महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी यांचे सुवासिनींनी केले औक्षण गावातून शोभायात्रा काढण्यात आली

त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तयार असलेल्या अन्नपूर्णामाता मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी येथे शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञास रविवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने गावातून शोभायात्रा काढण्यात आली होती. आश्रमापासून निघालेली शोभायात्रा संत निवृत्तिनाथ रोड, तेली गल्ली, भगवती चौक, बोहोरपट्टी, लक्ष्मीनारायण चौकमार्गे मेनरोडने कुशावर्तावर नेऊन धार्मिक पूजाविधी पार पाडून शोभायात्रा पुनश्च आश्रमात आणण्यात आली. यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी यांचे सुवासिनींनी औक्षण केले.घोडेस्वार, भगवे ध्वज घेउन चालणारे भाविक, त्यांच्यामागे ऊस घेऊन चालणाºया भाविकांच्या झुंडी, त्यांच्या मागे डोक्यावर कलश घेउन चालणाºया महिला आणि त्यानंतर महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी यांचा रथ, त्यांच्या मागे महात्मा बसलेले दोन रथ आणि शेवटी भाविक अशी लांबच लांब मिरवणूक संपन्न झाली. यावेळी तीन बँण्ड पथक व दक्षिण भारतातील कलाकरांचा वाद्यवृंद असा सर्व मिरवणुकीचा सोहळा होता. रस्त्यावर जागोजागी नक्षीकोरलेल्या रंगीत रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.अन्नपूर्णामातेचे सुंदर आणि विलोभनीय संगमरवरी पाषाणाचे मंदिर साकारले आहे. या मंदिराची संकल्पना ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी प्रभानंदगिरीजी यांची होती. आणि आता त्यांचेच शिष्य विद्यमान संस्थापक श्री श्री महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी सिद्धपीठाधिश्वर यांच्या पुढाकाराने अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अन्नपूर्णामातेचे मंदिर उभारण्यात आले आहे.या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या बुधवारी (दि. २१) होत आहे. तथापि, या सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या लक्षचंडी महायज्ञाचा रविवारी पहिला दिवस असल्याने शोभायात्रा काढण्यात आली होती.मॉँ अन्नपूर्णा देवी आणि महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाच्या सान्निध्यात मायेच्या कृपाशीर्वादाने प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. भारताची अखंडता, संप्रभुता, सामाजिक एकता, विश्वशांती, जनकल्याण यासाठी या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.