शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ओबीसी नको सर्व जातींच्या आधारावर जनगणना करावी : आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:24 IST

नाशिक : केवळ ओबीसींची जनगणना न करता सर्व जातींच्या आधारावर जनगणना होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देश्री काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी रामदास आठवले नाशिक येथे आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केवळ ओबीसींची जनगणना न करता सर्व जातींच्या आधारावर जनगणना होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.श्री काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी रामदास आठवले नाशिक येथे आले होते. यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. २०११ नंतर अनेक बौद्धांनी आपल्या जातीच्या दाखल्यांवर बौद्ध असा उल्लेख केला आहे. पण जातीचा उल्लेख केला जात नसल्याने त्यांना सर्वसाधारण गटात धरले जात असून, असे लोक मागासवर्गीयांच्या सवलतींपासून वंचित राहात आहेत.याबाबत आपण लवकरच सुधारणा विधेयक आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा समतेचा सत्याग्रह असून आज देशभरात परिवर्तन होत आहे. देशभरात एक लाखाहून अधिक आंतरजातीय विवाह होत आहेत. ही चांगली बाब आहे मात्र अजूनही मागासवर्गीयांवर अत्याचाराच्या घटना सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. शासनकर्ती जमात बना, असे डॉ. बाबासाहेबांनी सांगितले होते, पण रिपाइं एकट्याने सत्तेवर येणे शक्य नाही युती केल्याशिवाय सत्ता मिळणार नाही. त्यामुळे रिपाइंने भाजपशी युती केली आहे. त्यामुळे काही विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अफवा पसरवत आहेत, मात्र पंतप्रधान मोदी हे संविधानाचा आदर करतात. संविधान हा माझ्यासाठी धर्मग्रंथ असल्याचे मोदी म्हणतात, असे आठवलेम्हणाले.केंद्र सरकारने आणलेल्या सीएए कायद्याचे समर्थन करून या कायद्याला आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्यावरून कॉँग्रेसला केंद्र सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली. मुस्लिमांना त्यापासून कोणताही धोका नसून जर त्यांचे नुकसान होणार असेल तर आपण मुस्लिमांच्या बाजूने उभे राहू, असेही त्यांनी सांगितले. दिल्लीत झालेल्या दंगलीमागे कॉँग्रेस आणि आपचा हात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. देशभरात एक कोटी सभासदांचे लक्ष्यकेंद्रीय निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) या पक्षाला मान्यता दिली असून, येत्या सहा महिन्यांत पक्षसदस्य नोंदणी करून पक्षांतर्गत निवडणुका घेऊन ते सर्व दस्तऐवज निवडणूक आयोगाला सादर करावयाचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्ष सदस्य नोंदणी करून संघटनात्मक निवडणुका घ्याव्यात. देशभरात किमान एक कोटी आणि महाराष्टÑात किमान ६० ते ७० लाख पक्ष सभासद नोंदणीचे उद्दिष्ट असून, कार्यकर्त्यांनी त्यासाठी कामाला लागावे अशा सूचना पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केल्या.

टॅग्स :kalaram templeकाळाराम मंदीरRamdas Athawaleरामदास आठवले