शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

नाशकात ‘व्हॅलेंटाइन डे’ चे सेलिब्रेशन जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 17:33 IST

नाशिक :एकमेकांप्रती असणारे प्रेम, जिव्हाळा व्यक्त करीत तरुणाईसह ‘प्रेम’ भावनेवर मनापासून प्रेम करणाºया अबालवृद्धांनी बुधवारी (दि.१४) व्हॅलेंटाइन दिन आपल्या खास नियोजनाप्रमाणे उत्साहात साजरा केला. आपल्या प्रिय व्यक्तींना भेटवस्तू देत नात्याची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न केलेला पाहण्यात आला. जवळपासच्या पर्यटनस्थळांवर सेल्फीचा आनंद घेत, प्रियजनांना निरनिराळ्या आकर्षक भेटी देत व्हॅलेंटाइन डेच्या सेलीब्रेशनला ...

ठळक मुद्देमनोरंजनावर भर  गुलाबासह आइस्क्रीम अन् गिफ्टला पसंती

नाशिक :एकमेकांप्रती असणारे प्रेम, जिव्हाळा व्यक्त करीत तरुणाईसह ‘प्रेम’ भावनेवर मनापासून प्रेम करणाºया अबालवृद्धांनी बुधवारी (दि.१४) व्हॅलेंटाइन दिन आपल्या खास नियोजनाप्रमाणे उत्साहात साजरा केला. आपल्या प्रिय व्यक्तींना भेटवस्तू देत नात्याची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न केलेला पाहण्यात आला. जवळपासच्या पर्यटनस्थळांवर सेल्फीचा आनंद घेत, प्रियजनांना निरनिराळ्या आकर्षक भेटी देत व्हॅलेंटाइन डेच्या सेलीब्रेशनला सुरवात झाली होती. काहींनी सिनेमा, हॉटेलिंग, काहींनी शॉपींग तर काहींनी जिवलगांशी भरभरुन गप्पा मारत हा दिवस साजरा केला. काहींनी मैत्रीच्या नात्याचे प्रेमाच्या नात्यात रूपांतर करण्यासाठी आवडत्या मित्र-मैत्रिणींकडे ‘रेड रोझ’ देत प्रियकर-प्रेयसी होण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच प्रियकर-प्रेयसींनी प्रेमाच्या नात्याला अधिकाधिक फुलविण्याचे एकमेकांना वचनही दिले. दरम्यान, व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाईने गंगापूर धरणाचा बॅक वॉटर, सोमेश्वर, खंडोबा टेकडी, फाळके स्मारक, पांडवलेणी, नेहरू वनोद्यान, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर, रामशेज, नांदूरमध्यमेश्वर यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणांना भेटी दिल्या. सायंकाळनंतर कॉलेजरोड परिसर मात्र तरुणाईने ओसंडून वाहत होता. सर्वच स्नॅक्सची दुकाने, आइस्क्रीम पार्लर, चाटच्या दुकानांसह गिफ्ट शॉपीमध्ये गर्दी दिसून आली.