नाशिक : लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आज देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली़ त्यानंतर शहरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला़ मोदी यांच्या शपथविधीला प्रारंभ झाल्यापासून शहरात रविवार कारंजा, भाजपाचे एन. डी. पटेल रोडवरील मध्यवर्ती कार्यालय, तसेच भाजपाच्या विभागीय मंडलांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला़ ‘वंदे मातरम्’, ‘नरेंद्र मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘अच्छे दिन आये है’, ‘हमारा नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता़ फ टाक्यांची आतषबाजी, ढोलांच्या दणदणाटात रविवार कारंजा, सिडको, पंचवटी परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला़ काही ठिकाणी ढोलांच्या तालावर आबालवृद्धांनी नृत्याचा ठेका धरल्याचे चित्र होते़ प्रामुख्याने रविवार कारंजा येथे एकत्र आलेल्या अजिंक्य साने मित्रमंडळ व कार्यकर्त्यांनी चौकात नरेंद्र मोदी व राज्यातील नेत्यांच्या अभिनंदनाचे मोठे फ्लेक्स लावले होते़ सायंकाळी शपथ विधीस प्रारंभ झाल्यापासून फटाके फोडत व ढोल वाजवत आनंदोत्सवास प्रारंभ करण्यात आला़ कार्यकर्त्यांनी लाडू एकमेकांना भरवत आनंद साजरा केला़ उपस्थित सर्वांनाही लाडूचे वाटप करण्यात आले़ राज्यातील नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्या शपथग्रहणानंतर जल्लोषात भर पडली़ एन. डी. पटेल रोडवरील भाजपाच्या मुख्यालयात फ टाके फ ोडून तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला़ यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, उपमहापौर सतीश शुक्ल, राहुल अहिरे, प्रकाश दीक्षित, रमेश गायधनी, अरुण शेंदुर्णीकर, सुजाता करजगीक र, भारती तांबोळी, हेमंत शुक्ल, महेंद्र गर्गे आदि उपस्थित होते़ सिडको भाजपाचे मंडल अध्यक्ष जगन पाटील, माजी सभागृह नेते बाळासाहेब पाटील, उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकर यांनी सिडको, गोविंदनगर भागात फटाक्यांची आतषबाजी करत तसेच लाडू वाटप करत आनंदोत्सव साजरा केला़ (प्रतिनिधी)
ऐतिहासिक क्षणाचे नाशकात ‘सेलिब्रेशन’
By admin | Updated: May 27, 2014 16:58 IST