शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वेळा संप करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बस सेवेचा तिसरा वर्धापन दिन साजरा 

By संजय पाठक | Updated: July 8, 2024 11:19 IST

हापालिकेच्या परिवहन बस सेवा म्हणजेच सिटी लिंकचा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 

संजय पाठक, नाशिक: गेल्या तीन वर्षात तब्बल नऊ वेळा संप केल्याने प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरलेल्या मार्क्स सिक्युरिटी या वाहकांचे मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपनीचा ठेका रद्द करून महापालिकेच्या परिवहन बस सेवा म्हणजेच सिटी लिंकचा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 

नाशिक महापालिकेची सिटी लिंक ही सेवा तीन वर्षांपूर्वी सुरू झाली. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ झाला होता. नाशिक शहरा व्यतिरिक्त महापालिकेच्या हद्दीपासून वीस किलोमीटर अंतरापर्यंत म्हणजेच ओझर, सिन्नर, कसबे सुकेणे, दिंडोरी, गिरणारे, त्र्यंबकेश्वर अशा विविध ठिकाणी ही सेवा दिली जाते दररोज सुमारे एक लाख प्रवासी या बस सेवेचा वापर करतात आणि महापालिकेला सध्या दररोज २७ लाख रुपयांचे उत्पन्न तिकिटाच्या माध्यमातून मिळते आहे.

दरम्यान, महापालिकेने वाहकांच्या पुरवठ्याचा ठेका दिला असून ठेकेदाराने त्यांचे वेतन वेळोवेळी न दिल्याने त्यांनी नऊ वेळा संप केला होता त्यामुळे या ठेकेदाराची सेवा टर्मिनेट करण्याची नोटीस नाशिक महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच मनपाच्या सिटीलिंकच्या वतीने देण्यात आली होती. तीन वर्षानंतर हा ठेका आज संपुष्टात आला असून आता नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे वेळोवेळी संप करणाऱ्या वाहकांच्या या ठेकेदाराला महापालिकेने आतापर्यंत एक कोटी ३४ लाख रुपयांचा दंड केला केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकBus Driverबसचालक