शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यालयात वृक्षलागवडीने नववर्ष केले साजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 22:13 IST

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले मराठी नववर्षाचे पर्यावरणाची गुढी उभारून स्वागत. यावेळी विद्यार्थ्यांनी नववर्षात जास्तीत जास्त फळाफुलांची झाडे लावण्याचा संकल्प केला.

ठळक मुद्देसृजनशीलता जोपासून निसर्ग समतोल साधण्याचा प्रयत्न

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले मराठी नववर्षाचे पर्यावरणाची गुढी उभारून स्वागत. यावेळी विद्यार्थ्यांनी नववर्षात जास्तीत जास्त फळाफुलांची झाडे लावण्याचा संकल्प केला.झाडे लावू गोड फळे खाऊ, झाडे आहेत हिरवीगार सावली देतात थंडगार, झाडे लावूया प्रदूषण टाळूया, गुढी उभारू ज्ञानाची भरारी घेऊ गुणवत्तेची, गुढी उभारू वृक्षांची काळजी घेऊ निसर्गाची, वृक्ष लावूया आनंदी राहूया, वृक्ष वाढवू घनदाट फार पाऊस पडेल जोरदार अशा विविध पर्यावरणपूरक घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रत्येक विद्यार्थी किमान १० झाडे लावून त्याची जोपासना करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करण्याचे नियोजन विद्यार्थ्यांनी केले. मुख्याध्यापक एस.बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपला वाढदिवस साजरा करताना किमान दरवर्षी एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे. म्हणजेच सृजनशीलता जोपासून निसर्ग समतोल साधण्याचा प्रयत्न होईल, असे प्रतिपादन मुख्याध्यापक देशमुख यांनी केले. या उपक्रमात आर.व्ही. निकम, आर.टी. गिरी, बी.आर. चव्हाण, एस.एम. कोटकर, एम.सी. शिंगोटे, एम.एम. शेख, सविता देशमुख, टी.के. रेवगडे, सी.बी. शिंदे, के.डी. गांगुर्डे, एस.डी. पाटोळे, आर.एस. ढोली, के.पी. साठे, ए.बी. थोरे आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.ठाणगावी कार्यक्रमठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक गुढी उभारून पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. येथील मारुती मंदिराला ग्रामस्थांच्या वतीने भगव्या झेंड्याची गुढी उभारण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते ए.टी. शिंदे यांच्या हस्ते गुढीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने साखर वाटप करून एकमेकांना नवीन मराठी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रामदास भोर, दत्तू आंबेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.