वणी : येथील मराठा विद्याप्रसारक समाज संचलित केआरटी हायस्कूलमध्ये जलदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी.बी. चंदन होते. पाणी ही जीवनावश्यक गोष्ट असून, पृथ्वीतलावर पिण्यायोग्य पाण्याची पातळी वितरण असमान आहे. आजही पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवत असून, येणाऱ्या पिढीसाठी ही धोक्याची घंटा आहे. आपण वेळीच सावध होऊन जलसंवर्धनाचे उपाय अवलंबून या समस्येला प्रयत्नपूर्वक सामोरे गेले पाहिजे, असे आवाहन चंदन यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापक के.आर. माळोदे, एम.एम. पाटील, के.एन. काळे, आर.वाय. पाटील एल.एस. पवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . सूत्रसंचालन एस.एल. कड यांनी केले. आभार जी.एम. तुंगार यांनी मानले.
वणी येथे जलदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 02:17 IST