शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

 एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत बालकांचा अन्नप्राशन दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 14:23 IST

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत रायमाळ वस्ती अंगणवाडी केंद्रात नुकताच सहा महिने पूर्ण झालेल्या ...

ठळक मुद्देकोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन फिजिकल डिस्टन्स

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत रायमाळ वस्ती अंगणवाडी केंद्रात नुकताच सहा महिने पूर्ण झालेल्या बालकांचा अर्धवार्षिक वाढदिवस (अन्नप्राशन) साजरा करण्यात आला.यावेळी स्तनदा मातांना कार्यक्र म साजरा करण्याचा उद्देश व हेतू सांगण्यात आला. बाळ जन्मल्यापासून बाळाला निव्वळ स्तनपान केले जाते व सहा महिन्यांनंतर बाळाला स्तनपानासोबत वरच्या पूरक आहाराची गरज असते. यासाठी माता सक्षमीकरण व बळकटीकरण, आहाराची मात्रा समजावून सांगण्यात येते की, बाळाला मऊसर शिजलेले अन्न, घनघट्ट प्रमाणात भरविणे तसेच हिरव्या पालेभाज्यांचे सूप तसेच अंडी, दूध, मांसाहार खाऊ घालावा, कोणतेही पथ्य पाळू नये. आपल्या रोजच्या आहारातील सर्व प्रकारच्या पदार्थांची चव कळावी यामुळे बाळ सुदृढ होऊन संसर्गजन्य आजारापासुन बचाव होतो व कुपोषण कमी होण्यास मदत होते. आहार शिजविण्यापूर्वी व बाळाला आहार भरविण्यापूर्वी हातांची स्वच्छता ठेवणे अशा प्रकारे मातांना मार्गदर्शन करण्यात आले.सद्यस्थितीला कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन फिजिकल डिस्टन्स ठेवून कार्यक्र म साजरा करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका कुसूम अस्वले यांनी बाळाचे औक्षण करून त्याला पूरक पोषण आहार भरविण्यात आला. यावेळी बाळाची माता साधना भुसाळ, अंगणवाडी मदतनीस सुनीता गांगुर्डे, सुनंदा उफाडे, मंदाबाई गांगुर्डे, शिला गांगुर्डे, अनिता उफाडे, भावना गांगुर्डे आदींसह स्तनदा माता उपस्थित होत्या.

टॅग्स :Governmentसरकारzpजिल्हा परिषद