शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या यंत्रापासून दूर साजरी करा होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:13 IST

होळी, धुळवड आणि रंगपंचमी सणाचा उत्साह साजरा करताना कोणताही अपघात घडू नये यासाठी महावितरणने ग्राहकांना विजेपासून दूर राहत सणाचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला आहे.

नाशिक : होळी, धुळवड आणि रंगपंचमी सणाचा उत्साह साजरा करताना कोणताही अपघात घडू नये यासाठी महावितरणने ग्राहकांना विजेपासून दूर राहत सणाचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला आहे. विजेच्या यंत्रणेजवळ आग, पाणी यांचा संपर्क आल्यास दुर्घटना घडू शकते ही शक्यता गृहित धरून अशा प्रकारच्या सणाच्या काळात अपघाताचा धोका टाळण्यासाठी ग्राहकांना सूचना करण्यात आलेल्या आहेत.सणाच्या काळात उत्साहाच्या भरात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते. यातून अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे बालगोपाळांनी काळजी आणि दक्षता घेण्याबरोबरच पालकांनीदेखील आपल्या पाल्यांच्या खेळण्याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. त्यांना धोक्याची कल्पना देण्याच्यादृष्टीने महावितरणने विजेच्या संभाव्य धोक्याबाबत ग्राहकांना आवाहन केले आहे.रंगोत्सव साजरा करताना पाण्याचा फवारा वीज वाहिन्यांपर्यंत उडणार नाही याची खबरदारी घ्यावी, रंग भरलेले फुगे परस्परांवर टाकताना ते वीज वितरण यंत्रणांना लागणार नाहीत, ओल्या शरीराने वीज वितरण यंत्रणांना स्पर्श करू नये, विजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी, घरात होळी खेळताना वीजमीटर, विजेचे प्लग, वीजतारा व वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करावा, ओल्या हाताने या वस्तू हाताळू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.होळी पेटवितानादेखील दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे महावितरणने म्हटले आहे. जेथे होळी पेटवायची आहे तेथे सभोवताली वीज वाहिन्या किंवा रोहित्र नाहीत ना याची खातरजमा करूनच होळी पेटवावी. अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडणे व यातून अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे़नागरिकांचे प्रबोधनअनेक ठिकाणी वीज वाहिन्या भूमिगत टाकण्यात आल्या आहेत. या भूमिगत वीज वाहिन्यांपासून दूर अंतरावर होळी पेटवावी. जेणेकरून भूमिगत वीजवाहिन्या सुरिक्षत राहतील. शक्यतो मोकळ्या जागेत, मैदानावर होळी पेटवावी. विजेचे अपघात प्राणघातक ठरू शकतात, एक चूकही जिवावर बेतू शकते, असे प्रबोधन महावितरणने केले आहे.

टॅग्स :Holiहोळीelectricityवीज