शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही, रखवालदारांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:27 IST

इंदिरानगर : इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी जागरूकता दाखवित पोलिसांच्या भरवशावर न राहता, स्वत:च स्वत:च्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार ...

ठळक मुद्दे गुन्हेगारीवर नियंत्रण। मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना

इंदिरानगर : इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी जागरूकता दाखवित पोलिसांच्या भरवशावर न राहता, स्वत:च स्वत:च्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला असून बंगले, कॉलनी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबरोबरच काही ठिकाणी रखवालदारांची नेमणूक केली आहे. त्यामुळे गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळविण्याबरोबच रखवालदारांमध्ये परिसराची स्वच्छता राखण्यास मदत होऊ लागली आहे.सुमारे ४५ वर्षांपूर्वी बंगल्यांची कॉलनी व सोसायटी म्हणून इंदिरानगरची ओळख होती. त्यात आता मोठ्या प्रमाणात वाढ होऊन उंच इमारतीही उभ्या राहिल्या आहेत. विशेष करून नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भरणा असलेल्या या भागातील अनेक रहिवाशांची मुले बाहेरगावी वा परदेशात नोकरी, शिक्षणासाठी स्थायिक झाल्याने कुटुंबात फक्त ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य राहिलेआहे.अशा परिस्थितीत त्यांच्याकडून बंगल्यांची देखभाल करणे अवघड झाले असून, जीविताच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाल्याने त्यावर उपाय म्हणून बंगल्याच्या आवारातच रखवालदाराची नेमणूक करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. स्वत:च्या संरक्षणाच्या दृष्टीने बंगल्याच्या परिसरातच छोटी रूम बांधून रखवालदाराची सोय करण्यात आली आहे.तर मोठ्या सोसायट्यांचा परिसर असलेल्या राजीवनगर, चेतनानगर, राणेनगर, वासननगर, विनयनगर, साईनाथनगर, सार्थकनगर, समर्थनगर, दीपालीनगर, सुचितानगर, कलानगर या भागातील अपार्टमेंट आणि सोसायट्यांच्या वाहनतळाच्या जागेतदेखील रखवालदारांच्या नेमणुकीच्या प्रकारात वाढ झाली आहे. रखवालदारांमुळे येणाºया-जाणाºया व्यक्तीची विचारपूस केली जात असून, त्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या वावरावर निर्बंध बसले आहेत.रखवालदाराच्या नेमणुकीबरोबरच त्याच्या कुटुंबीयांनाही परिसरात रोजगार उपलब्ध होत आहे. असाच प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बाबतीत झाला आहे. इंदिरानगर परिसरात ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी तसेच अनेक सोसायट्या, कॉलनींमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.जागोजागी सीसीटीव्ही लावण्यात आल्याचे फलक लावण्यात आल्यामुळे गुन्हेगारांना काही प्रमाणात आळा बसला असून, इमारतीच्या तळमजल्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या स्पेअरपार्टची चोरी, वाहन चोरी आदी किरकोळ चोºयांच्या घटनेमध्ये कमालीची घसरण झाली आहे.बंगले, अपार्टमेंटमध्ये रखवालदारांच्या निवासी नेमणुकीमुळे परिसराची स्वच्छता राखण्यास मदत होत असून, दिवसभर रखवालदारांच्या कुटुंबाचे सोसायटी, बंगल्यांकडे लक्ष राहत असल्यामुळे अनोळखी व्यक्तींची विचारपूस केल्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जात नाही. सीसीटीव्ही कॅमेºयांमुळेदेखील अनेक बंगले, सोसायट्यातील रहिवासी निर्धास्त झाले आहेत.

टॅग्स :cctvसीसीटीव्ही