शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

मनपा शाळांमध्ये बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: March 26, 2015 22:48 IST

नगरसेवक निधी आता २० लक्ष रुपये

मालेगाव : येथील महानगर-पालिकेच्या अंदाजपत्रक विशेष महासभेत स्थायी समिती सभापती अस्लम अन्सारी यांनी ३५३ कोटी रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर येत्या सोमवारपर्यंत ही महासभा तहकूब करण्यात आली. अध्यक्षस्थानी महापौर हाजी मोहंमद इब्राहिम होते.मनपा प्रशासनाने स्थायी समितीपुढे यंदाचे ३३० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होेते. त्यात स्थायीने साधारण २३ कोटी रुपयांची वाढ सुचवत ३५३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. यासंदर्भातील माहिती स्थायी समिती सभापती अस्लम अन्सारी यांनी दिली. त्यात मनपा शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व या शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक मनपा शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची घोषणा अन्सारी यांनी केली.शहरातील विविध आरक्षित अकरा जागा, हजारखोली प्रसूतिगृह, बागे मेहमूद, नजमाबाद जलवाहिनी, पवारवाडी पोलीस ठाणे परिसरात रस्ते व गटारीसाठी स्थायी समितीने विशेष तरतूद केली आहे. तसेच मनपा प्रशासनाने नगरसेवकांना आपापल्या वॉर्ड विकासकामासाठी केलेली प्रत्येकी चार लाखाची तरतूद स्थायीने थेट प्रत्येकी २० लक्ष रुपयांपर्यंत वाढविली असल्याचे स्थायी सभापती अन्सारी यांनी सांगितले. नगरसेवक मदन गायकवाड यांनी हद्दवाढ भागासाठी वाढीव निधीची तर नगरसेवक रफीक अहमद यांनी सर्व्हे क्र. २११ मधील कामांचा समावेश करण्याची मागणी केली.सत्तारूढ तिसरा महाजचे ज्येष्ठ नगरसेवक एजाज उमर यांनी स्थायीने सादर केलेल्या या अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून येत्या सोमवारपर्यंत सदर अंदाजपत्रकीय महासभा तहकूब करण्याची सूचना मांडली. ती मंजूर करण्यात आली. (प्रतिनिधी)