विदर्भातील वाघ शिकार प्रकरणाचा तपास राज्य शासनाने सीबीआयकडे सोपविला आहे. त्यानंतर शुक्रवारी मेळघाटातील वाघ-अस्वल शिकार प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयची चमू दाखल झाली.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील ढाकणा वन्यजीव परिक्षेत्रात एका वाघाची तर पूर्व मेळघाट वनविभागाच्या घटांग परिक्षेत्रातील लेणाझरी (मसोंडी) जंगलात अस्वल आणि चार वाघांची शिकार झाली होती. त्यानंतर मेळघाट टायगर, सायबर क्राईम सेलने दिल्ली, पुणे, ओरिसा, मध्यप्रदेश, उत्तरांचल, आंधप्रदेश आदी राज्यांसह शहरामध्ये धाडी घालून तस्करांना जेरबंद करण्यात यश मिळविले. विदर्भातील वाघ शिकार प्रकरणात आर्थिक पुरवठा करणारा दिल्ली येथील सूरज पाल ऊर्फ चाचा, सरजू बावरिया, नरेश रणजीत भाटीयासह तीसपेक्षा अधिक तस्करांना अटक केली. व्याघ्र प्रकल्प व वनविभागाच्यावतीने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.मेळघाटातील वाघ शिकार प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयची चमू मेळघाटात शुक्रवारी दाखल झाली आहे. देशात व विदेशात लपून बसलेल्या तस्करांना यामुळे तत्काळ अटक केली जाऊ शकते, असे पूर्व मेळघाट वन विभागचे उप-वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.
मेळघाटात सीबीआयची चमू दाखल
By admin | Updated: May 10, 2014 23:50 IST