शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
2
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
3
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
4
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
5
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
8
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
9
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
10
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
11
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
12
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

खबरदारी : शहरात पोलिसांचा जमावबंदी आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 16:34 IST

जोरजोराने सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे घोषणाबाजी करणे, राज्याची सुरक्षा धोक्यात येईल, यासारखे चिथावणीखोर भाषणे करणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे, निर्देशित वेळेव्यतिरिक्त अन्य वेळेत फटाके वाजविणे आदी प्रकारच्या कृत्यांवर बंदी

ठळक मुद्देपाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जावजमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू गावठी कट्टे, चाकू, चॉपर, तलवारी सोबत बाळगण्यावर पुर्णपणे बंदी

नाशिक : शहर व परिसरात बुधवारी (दि.१०) रात्रीपासून तर येत्या बुधवारपर्यंत (दि.२४) पंधरवड्यासाठी जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी जारी केली आहे.

आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, क्रांतीवीर लहुजी साळवे पुण्यतिथी, कॉम्रेड गोविंद पानसरे पुण्यतिथींसारखे सार्वजनिक सण, उत्सव या काळात साजरे होत आहे. तसेच दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर नाशकातील शेतकरी व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांकडून (सीआयटीयु संघटना) निदर्शने, आंदोलने होण्याची दाट शक्यता लक्षात घेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे अधिसुचनेत म्हटले आहे.

दरम्यान, यानिमित्ताने शहरात दाहक व स्फोटक पदार्थ, लाठ्या, काठ्या, गावठी कट्टे, चाकू, चॉपर, तलवारी सोबत बाळगण्यावर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे किंवा प्रेताचे दहन करत प्रदर्शन करण्यासही मनाई करण्यात आली आहे. जोरजोराने सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे घोषणाबाजी करणे, राज्याची सुरक्षा धोक्यात येईल, यासारखे चिथावणीखोर भाषणे करणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे, निर्देशित वेळेव्यतिरिक्त अन्य वेळेत फटाके वाजविणे आदी प्रकारच्या कृत्यांवर बंदी घालण्यात आल्याचे अधिसुचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. या अधिसुचनेचे उल्लंघन करताना आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जावमहाराष्ट्र पोलीस कायदा कलमान्वये पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असून पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहे. जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, अंत्ययात्रा, सिनेमागृह यांना लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFarmers Protestशेतकरी आंदोलन