शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात प्रवासी येऊ न देण्याची खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:25 IST

नाशिक : शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करीत हजारो परप्रांतीय मजूर गावाकडे निघाले असून, अजूनही मजुरांचे लोंढे रस्त्यांवर दिसून येत आहेत

नाशिक : शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करीत हजारो परप्रांतीय मजूर गावाकडे निघाले असून, अजूनही मजुरांचे लोंढे रस्त्यांवर दिसून येत आहेत. या परप्रांतीय मजुरांचे जत्थे शहरात येण्यापूर्वीच त्यांना ठाणे, कसारा आणि इगतपुरी येथे रस्त्यावरच थांबवून त्यांच्यासाठी बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. रविवारी सुमारे ८० बसेस सोडण्यात आल्यानंतर सोमवारी (दि.११) देखील १०३ बसेसने परप्रांतीय मजुरांना मध्य प्रदेशातील सीमारेषेपर्यंत सोडण्यात आले.नाशिक जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यांमध्ये असलेले परप्रांतीय मजूर बेरोजगारीमुळे गावाकडे परतत असून, रस्त्यावर मजुरांचे लोंढे गावाच्या दिशेने निघाल्याचे दिसून येतात. गेल्या आठवड्यापासून हजारो परप्रांतीय गावाच्या दिशेने रवाना झाले आहेत, तर अजूनही मजूर मोठ्या संख्येने पायी प्रवास करताना दिसू येत आहेत. या मजुरांची वाहतूक करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. सोमवारी ठाणे येथूनच प्रवाशांना घेऊन बसेस मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना झाल्या. ठाण्याकडून बरेच लोक पायी निघाल्याचे प्रशासनाला समजल्यानंतर त्यांना पुढे येऊ न देता ठाणे येथूनच गाडीत बसवून पुढे मार्गस्थ करण्यात आले. यासाठी नाशिक येथून ठाण्याला ३६ बसेस पाठविण्यात आल्या होत्या. प्रवाशांना रस्त्यातच थांबवून त्यांच्यासाठी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, शहरातून पायी जाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा प्रशाासनाने केला आहे. ठाण्याप्रमाणे शहर, जिल्ह्यातून काही बसेस सोडण्यात आल्या. नाशिक आगार एकमधून १८, आगार २ मधून १३, मनमाड येथून ४, इगतपुरीतून ८, लासलगावातून ९, पिंपळगाव येथून ११ अशा एकुण ६७ बसेस मजुरांना घेऊन मध्य प्रदेशाकडे रवाना झाल्या.----------शासनाच्या आदेशाप्रमाणे नाशिकमधून परप्रांतीय मजुरांसाठी बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाच्या आदेशानुसार प्रवासी असलेल्या ठिकाणी तत्काळ बस पाठवून मजुरांना मध्य प्रदेश सीमारेषेवर सोडले जात आहे. गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात मजुरांना मध्य प्रदेशापर्यंत सोडण्यात आले आहे.- नितीन मैंद, विभाग नियंत्रक

टॅग्स :Nashikनाशिक