शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्ताचे कारण ; जनता दरबार भरलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:27 IST

नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरणार...वेळ ठरली सोमवारी (दि.२५) सकाळी अकरा वाजेची...शांतता समिती सदस्यांना निमंत्रण धाडले गेले. निमंत्रणाला मान देऊन (नेहमीप्रमाणे) ‘जनता’ पोलीस ठाण्यात हजर झाली अन् पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटीलदेखील उपस्थित राहिले;

पंचवटी : नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरणार...वेळ ठरली सोमवारी (दि.२५) सकाळी अकरा वाजेची...शांतता समिती सदस्यांना निमंत्रण धाडले गेले. निमंत्रणाला मान देऊन (नेहमीप्रमाणे) ‘जनता’ पोलीस ठाण्यात हजर झाली अन् पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटीलदेखील उपस्थित राहिले; मात्र अचानक पंचवटी पोलिसांना ‘रंगपंचमी’चा साक्षात्कार झाला अन् बंदोबस्ताचे कारण पुढे करून ‘जनता’ दरबाराविनाच माघारी पाठविली गेली. परिणामी पंचवटी पोलिसांनी एप्रिल आरंभापूर्वीच ‘एप्रिल फूल’ केल्याची चर्चा रंगली.नव्याने पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर पहिलीच भेट पंचवटी पोलीस ठाण्याला देणारे नांगरे-पाटील यांना त्या पहिल्या भेटीतच फारसा काही चांगला अनुभव आला नाही. त्यानंतर सोमवारी ‘जनता दरबार’ भरणार म्हणून त्यांनाही बोलविले गेले. ते वेळेत हजर झाले; मात्र रंगपंचमीचा बंदोबस्त असल्याने जनता दरबार रद्द झाल्याची घोषणा पोलीस ठाण्यातून केली गेली. नांगरे-पाटील यांनी पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांसोबत मोजका वेळ चर्चा करत ‘सूचना’ केली आणि पोलीस ठाणे आपल्या खास शैलीत सोडले.मागील खूप दिवसांनंतर ‘जनता दरबार’चे निमंत्रण मिळाल्यामुळे नागरिक रंगपंचमी विसरून पोलीस ठाण्यात एकत्र आले. सुमारे तासभर नागरिकांना ताटकळत ठेवल्यानंतर जनता दरबार रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दरबारासाठी आलेल्या जनतेच्या समस्यांचे निराकरण होणे तर लांबच; मात्र त्यांच्या पदरी घोर निराशा आली. यापुढे पंचवटी पोलिसांच्या दरबाराला ‘जनता’ कसा प्रतिसाद देते, हे बघण्यासारखे असेल.नागरिक तासभर ताटकळलेपंचवटी पोलीस ठाण्यात उपस्थित नागरिकांना कुठलीही माहिती कोणत्याच पोलीस अधिकाऱ्याने किंवा कर्मचाºयाने न दिल्याने नागरिकांना ताटकळत बसावे लागले. जनता दरबार रद्द झाल्याचे कानावर पडताच त्यांनी ऐन रंगपंचमीच्या दिवशी पोलिसांनी एप्रिल फूल केल्याचे सांगत पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील