नाशिकरोड : जयभवानी रोड आर्टिलरी सेंटरलगत असलेल्या भर लोकवस्तीतील अश्विन कॉलनीतील ‘जानकी’ बंगल्याच्या आवारात गुरुवारी सकाळी बिबट्याचा बछडा वावरत असल्याने परिसरात धांदल उडून भीतीचे वातावरण पसरले होते. बंगल्याच्या बाहेरील मोरीत दडी मारून बसलेल्या बछड्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून ताब्यात घेतल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आर्टिलरी सेंटररोड लगत असलेल्या व वालदेवी नदी किनारी असलेल्या देवळालीगाव डोबी मळा परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असते. आर्टिलरी सेंटर, गांधीनगर विमानतळ या भागात मोठी जंगलसदृश परिस्थिती असल्याने या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे. आर्टिलरी सेंटरलगत असलेल्या जय भवानीरोड सेंट झेवियर्स शाळेच्या क्रीडांगणाच्या मागील भिंतीलगत अश्विनी कॉलनी या ठिकाणी बहुतांश सेवानिवृत्त लष्करी अधिकारी राहतात. स्वतंत्र बंगल्याच्या असलेल्या या कॉलनीत प्रत्येक बंगल्याच्या आवारात अनेक झाडे लावलेली आहेत.
आर्टिलरी सेंटरजवळ बिबट्याचा बछडा पकडला
By admin | Updated: August 21, 2015 00:11 IST