शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

वनविभागाच्या पिंजऱ्यात अखषर अडकला बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 17:44 IST

कळवण : तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील शेतात ऊसतोड मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने भयभयीत झालेल्या शेतकरी बांधवाना वनविभागाच्या पिंजºयात बिबट्याची मादी अडकल्याने दिलासा मिळाला असून वनविभागाच्या कामावर शेतकरी बांधवानी समाधान व्यक्त केले असून वनविभागाच्या यंत्रणेचे गावात कौतूक होत आहे.

ठळक मुद्देकळवण : शेतकऱ्यांमध्ये समाधान

कळवण : तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील शेतात ऊसतोड मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने भयभयीत झालेल्या शेतकरी बांधवाना वनविभागाच्या पिंजºयात बिबट्याची मादी अडकल्याने दिलासा मिळाला असून वनविभागाच्या कामावर शेतकरी बांधवानी समाधान व्यक्त केले असून वनविभागाच्या यंत्रणेचे गावात कौतूक होत आहे.पाळे खुर्द परिसरात बिबट्या मादी गेल्या पाच सहा दिवसापासून वनविभागाच्या पिंजºयात येतं नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते तर वनविभागाची यंत्रणा सातत्याने या परिसरात लक्ष देऊन शेतकºयांना दिलासा देत होती.कळवण तालुक्यात सध्या कांदा लागवड व ऊसतोड हंगाम जोमात सुरु आहे. पाळे खुर्द येथील विकी दादाजी पाटील यांचे गट नंबर ४१५ या शेतात ऊसतोड सुरु असतांना मंगळवारी (दि.२४) चार वाजता मजुरांना बिबट्याचे १० ते १२ दिवसांचे नवजात तीन बछडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ऊसतोड मजुरांना बछड्यांसह मादीचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.याबाबत कळवण वनविभागाला माहिती देण्यात आल्याने या परिसरात वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावला होता. बिबट्या मादी पिंजºयात येत नसल्याने वनविभाग यंत्रणा अस्वस्थ होती. बिबट्याची ३ बछडी कधी उसाच्या शेतात तर कधी बाहेर येत होती. परंतु ट्रॅप कॅमेºयात मादी दिसून येत नव्हती.शनिवारी (दि.२८) रात्री ३ व वाजेच्या सुमारास बिबट्या मादी पिंजºयात पडल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. बिबट्या मादी व तीन बछडे सुरक्षित असून पशुधन अधिकारी, पशु वैद्यकीय अभोणा यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली असल्याची माहिती कळवणचे वन परिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. पाटील यांनी दिली.वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. बी. हिरे वनरक्षक पंकज देवरे, चव्हाण, सोनवणे, सुचिता पाटील, वनमजूर गोंधळे, बस्ते यांनी मोहीम यशस्वी केली.शेतकºयांना दिलासा..कळवण तालुक्यात कांदा लागवड व ऊसतोड सुरु आहे. वीज वितरण कंपनीकडून शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा सुरु असल्याने शेतकºयांना रात्री पिकांना पाणी भरल्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. बिबट्याच्या भितीने नागरिकांचे रात्री घराबाहेर बाहेर निघणेही मुश्किल झाले होते. आता दिलासा मिळाला आहे. वनविभागाने तातडीने उपायोजना करून बिबट्या व बछडे जेरबंद केले.- विकी पाटील.(फोटो २९ कळवण बिबट्या, २९ कळवण बिबट्या १)पाळे खुर्द येथील विकी पाटील यांच्या उसाच्या शेतात आढळलेले बछडे.

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या