शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

रस्त्यांवर जनावरे मोकाट ; नागरिकांसह वाहनचालकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:10 IST

गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, यामुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

नाशिक : गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, यामुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे नाशिक महापालिका दुर्लक्ष करत आहे. गेल्या काही वर्षांपासून कोंडवाडे नामशेष होत चालले असून, शहरात व ग्रामीण भागात मोकाट जनावरांचा वावर वाढून उपद्रव वाढला आहे, याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.शहरातील रस्त्यांवर सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट बघावयास मिळत आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांमुळे दुचाकी वाहनधारकांना यामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील जेलरोड, सारडा सर्कल, सातपूर, त्रिमूर्ती चौक, सातपूर आदी भागांत अशा मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणावर वावर आढळून येत आहे. जनावरांच्या कळपामुळे वाहतुकीचा खोळंबाही होत आहे.काही ठिकाणी किरकोळ अपघाताचे प्रमाणदेखील वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. शहरी व ग्रामीण भागात पशुधन मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मोकाट जनावरे बाजारपेठेत व मुख्य रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने नागरिकांना आपली वाहने चालवणे मोठ्या जिकिरीचे झाले आहे. गंगापूररोड, आनंदवली, सोमेश्वर, गंगापूर, गोवर्धन या ठिकाणी रस्त्यावर मोकाट जनावरे बसल्याने रस्त्यावरील वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात.नागरिकांमध्ये नाराजीएखाद्या वाहनाने या जनावरांना गाडीने उडवले तर सर्व अदृश्य झालेले मालक आपला दावा दाखल करण्यासाठी तयार असतात. महापालिका अथवा गोवर्धन ग्रामपंचायत या जनावरांना पकडून कोंडवाड्यात सोडण्याची व मालकांना दंड करण्याची तसदी सुद्धा घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.जनावरांनी रस्त्यावर केलेल्या विष्टेपासून दुचाकी वाहने घसरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. महापालिका या घटनांकडे सरार्सपणे दुलक्ष करते. अशाप्रकारे जर नेहमीच वाहनचालकांचे अपघात होत असतील तर त्यांना जबाबदार नाशिक महापालिका राहणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.वाहनचालकांचे नुकसानही त्यांच्याकडून भरून घेतले पाहिजे. मोकाट जनावरांचा उपद्रव करण्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याचे अनेक उदाहरणे आहेत. यावर प्रतिबंध करण्यासाठी जनावरांना बंदिस्त करण्यासाठी कोंडवाड्याची निर्मिती केली पाहिजे.मोकाट जनावरांवर वेळीच कारवाई करायला हवी रस्त्याच्या मधोमध बसल्याने तसेच घाण केल्याने दुचाकी चालक व चारचाकी चालकांची वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. जनावरांना वाचविण्याच्या भानगडीत समोरून येणाºया वाहनासोबत अपघात होते, मोकाट जनावरांवर व त्यांच्या मालकांवर कारवाई करायला हवी.- पंकज सप्रे, आनंदवलीगंगापूररोड, आनंदवली, सोमेश्वर या भागात रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे घोळका करून बसतात तिथेच घाण करतात परिणामी वाहनचालकांना आपली वाहने हळू चालवावी लागते, मागून जोरात येणाºया वाहनाने एकतर जनावरांच्या अंगावर वाहन घालते किंवा वाहन घसरून खाली तरी पडते. त्यामुळे वाहनचालकांना दुखापत होते.- समाधान सोनावणे, रहिवासी

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडी