इगतपुरी : आख्ख्या तालुक्यासाठी केवळ दोनच टॅँकरघोटी : धरणांचा आणि प्रचंड पर्जन्याचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.पंचायत समितीकडे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव सादर करूनही चौदा गावांपैकी अवघ्या दोन गावांना शासनाने टॅँकरने पाणीपुरवठा करण्यास समर्थता दाखविली असून, उर्वरित गावांना मात्र पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी शासनावर अवलंबून न राहता लोकवर्गणी काढून आपली तहान भागवावी लागत आहे.तालुक्याला हंडामुक्त करून टंचाईमुक्त करण्याच्या उद्देशाने शासनाने विविध योजनांतून प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या असल्या तरी, नियोजनाअभावी शासनाच्या उदासीन धोरणामुळे तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. (वार्ताहर)
धरणांचा तालुका पाण्यासाठी कासावीस
By admin | Updated: May 3, 2016 00:29 IST