शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना रोखीने पैसे : वीस कोटी रुपयांची उलाढाल; सलग तीन दिवस राहणार लिलाव बंद लासलगाव, विंचूरला कांद्याची विक्रमी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:46 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात शुक्रवारी २२१७ वाहनांमधून सर्वाधिक ३४,८६६ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.

ठळक मुद्देबाजारभाव कमीत कमी ९०० रुपये दिवसभरात सुमारे दोन कोटींची उलाढाल शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात शुक्रवारी २२१७ वाहनांमधून सर्वाधिक ३४,८६६ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. बाजारभाव कमीत कमी ९०० रुपये तर जास्तीत जास्त ३,४२० रुपये व सर्वसाधारण २८५१ रुपये प्रतिक्विंटल होते. सर्व कांद्याचे सायंकाळपर्यंत लिलाव झाले. दिवसभरात सुमारे दोन कोटींची उलाढाल झाली.आठवड्याच्या शेवटच्या दिवशी येथील बाजार समितीच्या स्वतंत्र कांदा बाजार आवारात दिवसभरात १३७७ ट्रॅक्टर व ८४० पिकअपमधून ३४,८६६ क्विंटल कांदा विक्रीस आला होता. शनिवार, रविवार साप्ताहिक सुटी व सोमवारी अमावास्येमुळे कांदा लिलाव बंद राहणार असल्याने येथील बाजार समितीत कांदा विक्री करण्यासाठी शेतकºयांनी एकच गर्दी केली होती. आलेल्या सर्व कांद्याचे लिलाव पूर्ण करण्याच्या दृष्टीने अडते, व्यापारी, मदतनीस, कामगार व समितीच्या सेवकांनी जलदगतीने लिलाव प्रक्रिया पूर्ण केल्याने आज विक्र मी कांदा आवकेचा लिलाव पूर्ण करण्यात आले. सध्या लाल कांद्याबरोबरच येथील बाजार समितीत मका, सोयाबीन या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. आलेल्या सर्व आवकेचे पैसे त्याच दिवशी लिलाव पूर्ण करून शेतकरी बांधवांना रोख अथवा धनादेशाद्वारे दिले जात आहेत. आज बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारमिळून सुमारे वीस कोटी रुपयांची उलाढाल झाली. यंदा कांद्यास चांगले बाजारभाव मिळत असल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. बाजार आवारावर आलेल्या सर्व आवकेचे लिलाव वेळेत पूर्ण केल्याबद्दल बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती संदीप दरेकर, सचिव बी.वाय. होळकर यांच्यासह सदस्य मंडळाने सर्व अडते, व्यापारी, हमाल, मापारी, कांदा भरणार हमाल, मदतनीस व बाजार समिती सेवकांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.