शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

नागरेच्या बँक खात्यात ५५ लाखांची रोकड

By admin | Updated: December 29, 2016 00:43 IST

बनावट नोटा छपाई : अकरा खाती; कोठडीची मुदत आज संपणार

नाशिक : बनावट नोटा छपाई प्रकरणातील प्रमुख संशयित तथा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरेची तब्बल ११ बँक खाती शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. त्यामध्ये ५७ लाख ७२ हजार रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ पोलिसांनी इतर दहा अटक संशयितांच्या बँक खात्यांचीही तपासणी सुरू असून, नोटा छापण्याचे काम करणाऱ्या नागरेच्या साथीदाराचा शोध सुरू आहे़. दरम्यान, नागरेची बँक खाती सील करण्यात येणार असून या संशयितांना गुरुवारी (दि़ २९) न्यायालयात हजर केले जाणार आहे़पोलिसांनी अटक केलेल्या छबू नागरेची विश्वास बँकेत नऊ खाती असून स्टेट बँक आॅफ हैदराबाद व स्वत:च्या अ‍ॅक्सेस मायक्रो फायनान्समध्ये प्रत्येकी एक अशी अकरा खाती समोर आली आहेत़ यापैकी विश्वास बँकेतील नऊ खात्यांमध्ये ५५ लाख रुपये, तर उर्वरित दोन बँकांपैकी एका बँकेत ९१ हजार तर दुसऱ्या बँकेत १ लाख ६८ हजार असे एकूण ५७ लाख ७२ हजार रुपयांची रोकड आहे़ पोलिसांनी यापैकी तीन बँक खाती सील केली आहेत. पोलिसांनी २२ डिसेंबरला या अकरा संशयितांना अटक केल्यानतर त्यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ या कालावधीत पोलिसांनी नागरेच्या आॅसम ब्यूटिपार्लरमधून नोटा छपाईचे साहित्य जप्त करण्यात आले़ तसेच बँक खाती शोधण्यात आली़ याबरोबर इतर संशयितांच्या घराची तपासणी व बँक खात्यांचीही चौकशी सुरू आहे़ दरम्यान, या संशयितांची पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी न्यायालयात केली जाणार आहे़ (प्रतिनिधी)बनावट नोटा छपाई प्रकरणपुणे येथील आयकर विभागाच्या माहितीनुसार नाशिक पोलिसांनी २२ डिसेंबरला मध्यरात्री संशयित छबू नागरेसह अकरा संशयितांना तीन कारसह अटक केली़ त्यांच्याकडून जुन्या चलनातील १ लाख ८० हजार तर १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या़ राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे हा कमिशनवर जुन्या नोटा बदलून देण्यासाठी बनावट नोटांची छपाई करीत होता़ पोलिसांनी त्याच्या आॅसम ब्यूटिपार्लरमधून स्कॅनर, दोन प्रिंटर, कटर मशीन, शाई, कागद जप्त केले आहे़न्यायालयात उद्या हजर करणारन्यायालयाने छबू दगडू नागरे, रामराव तुकाराम पाटील, रमेश गणपत पांगारकर, संदीप संपतराव सस्ते, ईश्वर मोहन परमार, राकेश सरोज परमार, नीलेश सतीश लायसे, प्रभाकर केवल घरटे, संतोष भीमा गायकवाड, गौतम चंद्रकांत जाधव, प्रवीण संजयराव मांढरे या अकरा संशयितांना गुरुवारपर्यंत (दि़ २९) पोलीस कोठडी सुनावली होती़ त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे़