नाशिकरोड : बिटको चौकाजवळील बॅँक आॅफ बडोदाच्या बाहेर उभ्या असलेल्या गाडीतून दहा हजारांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरट्याने हातोहात चोरून नेली. सिन्नर येथील श्री साई पॉलीनोस कंपनीचे मालक शशिकांत बालाजी नवले बिटको चौकाजवळील बॅँक आॅफ बडोदाच्या शाखेत आले होते. बॅँकेतील कामकाज आटोपून दहा हजारांची रोकड, विविध बॅँकांचे महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग नवले यांनी स्विफ्ट डिझायर (एमएच १५, डीसी ८१४२) गाडीच्या चालक शिटशेजारील मागील बाजूचा दरवाजा उघडून गाडीत ठेवली. यावेळी नवले गाडीत बसत असतानाच भामट्याने त्याचक्षणी गाडीचा पाठीमागील दरवाजा अलगदरित्या उघडून गाडीतील बॅग हातोहात लंपास केली. नवले यांना रोकड व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका कोपऱ्यात गाडी लावण्यात आल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर बंदिस्त होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
कारमधून रोकड लंपास
By admin | Updated: June 28, 2016 00:30 IST