नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्टेशनजवळील बसस्थानकात झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातील रोख रक्कम व मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, धेरील रोहन यादव (रा़पेनथार शेला, ता़ बरगडा, जि़ हजारीबाग, झारखंड) हे सोमवारी रेल्वेस्थानकाशेजारील बसस्थानकात सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान झोपलेले होते़ या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाइल व ३५ हजार रुपये लंपास केले़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात यादव यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)
प्रवाशाच्या खिशातील रोकड लंपास
By admin | Updated: May 21, 2014 23:40 IST