शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल विक्र ीचे पैसे १ जूनपासून रोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 01:02 IST

उमराणे : 30 मे पर्यंत थकीत शेतकºयांचे पैसे मिळणारशेतमाल विक्र ीचे पैसे १ जूनपासून रोख उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळ, व्यापारी असोसिएशन व शेतकरी बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक होऊन धनादेश न वटणे व इतर कारणांमुळे कांदा उत्पादक शेतकºयांची व्यापाºयांकडील थकीत रक्कम ३० मे पर्यंत देण्यात येणार असून, १ जूनपासून मालविक्रीचे पैसे रोख स्वरूपात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्दे उमराणे : 30 मे पर्यंत थकीत शेतकºयांचे पैसे मिळणारठरावीक व्यापाºयांकडे शेतकºयांचे १ कोटी २८ लाख घेणे बाकी

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळ, व्यापारी असोसिएशन व शेतकरी बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक होऊन धनादेश न वटणे व इतर कारणांमुळे कांदा उत्पादक शेतकºयांची व्यापाºयांकडील थकीत रक्कम ३० मे पर्यंत देण्यात येणार असून, १ जूनपासून मालविक्रीचे पैसे रोख स्वरूपात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.गेल्या अनेक दिवसांपासून उमराणे बाजार समितीत शेतमाल विक्र ीचे पैसे धनादेशाद्वारे देण्यात येत होते; परंतु बहुतांश व्यापाºयांकडील धनादेश न वटता परत येत असल्याने व इतर कारणांमुळे शेतकºयांचे १३ कोटी रु पये थकले होते. बाजार समितीने संबंधित व्यापाºयांकडे वारंवार तगादा लावून शेतकºयांचे ११ कोटी ७२ लाख रु पये टप्प्याटप्प्याने चुकते करण्यास भाग पाडले होते. आजमितीस येथील ठरावीक व्यापाºयांकडे शेतकºयांचे १ कोटी २८ लाख घेणे बाकी आहे. या व्यापाºयांना 30 मे च्या आत शेतकºयांचे पैसे चुकते करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असून, पैसे न दिल्यास जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीने स्थापन करण्यात आलेल्या न्यायाधिकरण समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच १ जूनपासून बॅँकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उपलब्ध झाल्यास मालविक्रीचे पैसे रोखीने देण्यात येणार असून, अडचण आल्यास आरटीजीएस व एनएफटीद्वारे चोवीस तासाच्या आत संबंधित मालविक्र ी करणाºया शेतकºयांच्या बॅँक खात्यावर पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. दरम्यान, थकीत शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने ७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार होते; परंतु ३० मे च्या आत थकीत शेतकºयांना पैसे देण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेत असल्याचे प्रहारचे देवळा तालुकाध्यक्ष संजय देवरे व कार्यकर्त्यांनी जाहीर केले.बैठकीस देवळा तालुका सहायक निबंधक संजय गिते, बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे, उपसभापती महेंद्र पाटील, संचालक मंडळ, व्यापारी असो.चे अध्यक्ष खंडू पंडित देवरे तसेच समितीचे सचिव नितीन जाधव व शेतकरी बांधव उपस्थित होते.उमराणे बाजार समितीत माल विक्र ी केलेल्या शेतकरी बांधवांची थकीत रक्कम पूर्णपणे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून, गरज पडल्यास न्यायाधिकरण समितीचा आधार घेत व्यापाºयांकडून पैसे वसूल करून शेतकºयांना अदा करण्यात येतील.- राजेंद्र देवरे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीयेथे एकच राष्ट्रीयीकृत बॅँक असून, व तेथेही पैसे मिळण्यास मर्यादा असल्याने मालविक्र ीचे पैसे रोखीने देणे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे शेतकरी हितावह निर्णय घेण्यासाठी व्यापाºयांना पैसे काढण्यासाठी मर्यादा वाढविणे गरजेचे आहे.- संजय देवरे, कांदा व्यापारी

गेल्या काही दिवसांपासून कांदा व्यापारी अडचणीत सापडला असला तरीही ज्यांच्याकडे शेतकºयांचे पैसे देणे आहेत ते येत्या महिनाभरात देण्यात येणार असून, १ जूनपासून मालविक्र ीचे पैसे रोखीने देण्याचे व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत ठरविण्यात आले.- खंडू पंडित देवरे, अध्यक्ष, व्यापारी असो., उमराणेयेथील बाजार समितीचा नावलौकिक असून, मालविक्र ेत्या शेतकºयांचा विश्वास असल्यानेच इतर बाजार समित्यांच्या तुलनेत येथील बाजार समितीत काद्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. परंतु काही शेतकºयांना हाताशी धरु न राजकारण केले जात आहे.- धर्मा देवरे, पंचायत समिती सदस्य