शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वीजचोरी केल्याप्रकरणी ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:11 IST

वडनेर-पाथर्डी रोडवरील केक शॉपमधील वीजमीटरमध्ये लुप वायर टाकून वीजमीटरच्या मूळ रचनेत फेरफार करून ८० हजारांची वीजचोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : वडनेर-पाथर्डी रोडवरील केक शॉपमधील वीजमीटरमध्ये लुप वायर टाकून वीजमीटरच्या मूळ रचनेत फेरफार करून ८० हजारांची वीजचोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महावितरण भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २७ एप्रिल २०१८ रोजी वडनेर-पाथर्डी रोडवरील जसवंत सिंग यू. चव्हाण यांच्या केक शॉपला भेट देऊन वीजमीटरची पाहणी केली. यंत्राद्वारे वीजमीटर तपासले असता ६८.२७ टक्के मंद गतीने वीजमीटर फिरत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. सदर वीजमीटर महावितरणच्या मीटर चाचणी विभागात पाठविण्यात आल्यानंतर वीजमीटरमध्ये लुप वायर टाकून मीटरच्या मूळ रचनेत फेरफार करून वीजचोरी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ७९ हजार ५८० रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले असून, महावितरणकडून ६५ हजार रुपये वीजबिल भरण्याची तजवीज ठेवली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :electricityवीज