नाशिक : मानवी वागणुकीतील विविध किश्शांसोबत मार्मिक व्यंगचित्रांचा कलाविष्काराच्या माध्यमातून व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी नाशिककरांना लोटपोट केले. निमित्त होते, महाराष्टÑ समाज सेवा संघ संचलित रचना विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षारंभनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. सोमवारी (दि.११) परशुराम सायखेडकर नाट्यगृहता झळके यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून नाशिककरांची दिलखुलास दाद घेत 3मनमोकळे हसविले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, उपाध्यक्ष विजय डोंगरे, सहसचिव शांताराम अहिरे, ना. सी. पाटील, निरंजन ओक, साहेबराव हेंबाडे, कौस्तुभ मेहता आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी झळके यांनी भन्नाट विनोदी किस्से सांगत उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी त्यांनी कुंचल्यातून व्यंगचित्रांचा आविष्कार दाखवून पूर्वपीठिका वर्णन करून उपस्थितांचे लक्ष वेधले. सचिव सुधाकर साळी यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
व्यंगचित्रांनी नाशिककर लोटपोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:00 IST