पंचवटी : नवीन आडगाव नाक्यावरील तपोवन ब्रह्मचर्य आश्रम संचलित श्री स्वामिनारायण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्टून डे साजरा करण्यात आला. कार्टून हा लहान मुलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने मॉँटेसरी विभागात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्टून डे निमित्ताने विद्यार्थ्यांनी बालगणेश, मिकी माउस, छोटा भीम, टॉम अॅण्ड जेरी, स्पायडरमॅन, बार्बी डॉल, सुपरमॅन, बॅटमॅन आदि कार्टूनची वेशभूषा केली होती. यावेळी माधव प्रकाश स्वामी, मुख्याध्यापक अस्मिता पटेल, अनिता डापसे उपस्थित होते.
स्वामिनारायण शाळेत कार्टून डे साजरा
By admin | Updated: September 4, 2015 23:45 IST