शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूकदारांचे ‘चक्काजाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:55 IST

देशात वाढत चाललेली असहनीय डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई-वे बिलप्रणाली यातून शासनाने दिलासा द्यावा.

नाशिक : देशात वाढत चाललेली असहनीय डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई-वे बिलप्रणाली यातून शासनाने दिलासा द्यावा.  याप्रमुख मागण्यासाठी देशभर आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून शुक्रवारपासून (दि.२०)देशभरात तीव्र स्वरूपात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने जिल्हाभरात सुमारे १२ हजारांहून अधिक मालवाहतूक करण्याऱ्या वाहनांची चाके थांबली आहे.जिल्हाभरात १५०० हून अधिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक या संपात सहभागी झाले असून, या आंदोलनासाठी निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स व अवजड वाहतूक सेना यांसह विविध संघटनांनीही पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सरकारने डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तसेच यावरील अधिभार कमी करणे, तसेच देशभरात डिझेलचे दर हे एकसमान असावे, त्याचबरोबर न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई-वे बिलप्रणाली यातून शासनाने दिलासा देण्याची मागणी मालवाहतूकदारांनी केली आहे. या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून गांधीगिरी पद्धतीने बेमुदत आंदोलन सुरूच राहील. तसेच नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या संलग्न असलेले व्यावसायिकांचा एकही ट्रकमधून कुठल्याही मालाची वाहतूक करणार नसल्याची माहिती नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा व वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, माजी अध्यक्ष अंजू सिंगल, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल चंदा, चेअरमन एम. पी. मित्तल यांनी दिली आहे. माल वाहतूकदारांच्या या देशव्यापी संपात नाशिक जिल्ह्यातून नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक अवजड वाहतूक सेना, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनसारख्या संघटनांनी सहभाग घेतला असून, येत्या दोन दिवसांत प्रवासी वाहतूकदार आणि पुढील तीन चे चार दिवसांत विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बस वाहतूकदारही सहभागी होणार असल्याची माहिती आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून देण्यात आली आहे.चालकांसाठी भोजनाची सेवादेशभरात मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या संपामुळे ट्रकचालकांनी आपल्या मालाची वाहतूक पूर्णपणे थांबविली आहे. त्यांच्यासाठी आडगाव ट्रक टर्मिनल, विल्होळी ट्रक टर्मिनल व चेहडी नाका येथे गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आडगाव ट्रक टर्मिनल येथे ट्रकचालकांसाठी भोजनाची सेवा करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर ठिकाणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या संलग्न असलेल्या व्यावसायिकांकडून ट्रकचालकांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे सागण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक