मनमाड : येथील सगळे लॉन्समध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एसएनजेबी तंत्रनिकेतनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अजित सुराणा, अरविंद भन्साळी, मुख्याध्यापक एस.एस. सुतार, क्रांती कुंझरकर, कल्पना लांबोळे, दिवाकर दोंदे, धनंजय निंभोरकर, सोनल सोनार, वणिता गुप्ता आदी उपस्थित होते.तंत्रज्ञान हा प्रत्येक क्षेत्राचा अविभाज्य घटक असून, त्याची गरज प्रत्येक क्षेत्रात भासत आहे. तंत्रशिक्षणात अमर्याद संधी असल्याचे एसएनजेबी तंत्रनिकेतन विभागाचे प्रमुख प्रा. एम.आर. संघवी यांनी सांगितले. नीरजा प्रसाद व जी.डी. शिंदे यांनी करिअर निवडीसाठी मार्गदर्शन केले. तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी मंगेश सगळे, नितीन लुणावत, मुख्तार कुरेशी, अंकुश जोशी, समित दुगड, दिनेश परदेशी, प्रसाद कुंजरकर, रूपाली पगारे यांचा गौरव करण्यात आला.शिबिराचे आयोजन प्राचार्य एच.एस. गौडा, डॉ. व्ही.ए. वानखेडे, आर. सी. तिवारी, पी.एम. बाफना, डी.व्ही. लोहार, के.बी. गुप्ता यांनी केले. सूत्रसंचालन एम.एम. वाघ, अल्केश अजमेरे यांनी केले.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:20 IST
मनमाड : येथील सगळे लॉन्समध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एसएनजेबी तंत्रनिकेतनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती होते.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर
ठळक मुद्देमनमाड : एसएनजेबी तंत्रनिकेतनचा पुढाकार