शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

वाहक-चालकाकडून मृतदेहाची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:11 IST

शिर्डी येथून उपचार करून पत्नी व दिव्यांग मुलासह राज्य परिवहन महामंडळाच्या बसने घरी परतणाऱ्या बारकू भिवसन जाधव (६५) यांना मालेगावजवळ बसमध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शिरपूर आगाराच्या वाहक व चालकाने बस रुग्णालयात नेत त्यांना दाखल न करता थेट जुना बसस्थानकावर उतरवून देत त्यांच्याकडून तिकीट घेऊन बस शिरपूरकडे घेऊन गेले.

ठळक मुद्देमालेगाव। रुग्णालयात दाखल न करता मृतदेह बसस्थानकावर ठेवून पलायन

मालेगाव : शिर्डी येथून उपचार करून पत्नी व दिव्यांग मुलासह राज्य परिवहन महामंडळाच्या बसने घरी परतणाऱ्या बारकू भिवसन जाधव (६५) यांना मालेगावजवळ बसमध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शिरपूर आगाराच्या वाहक व चालकाने बस रुग्णालयात नेत त्यांना दाखल न करता थेट जुना बसस्थानकावर उतरवून देत त्यांच्याकडून तिकीट घेऊन बस शिरपूरकडे घेऊन गेले.मानवतेला काळिमा फासणाºया व मृतदेहाची हेळसांड करणाºया वाहक व चालकावर कारवाई करावी, अशी मागणी जाधव कुटुंबीय, नगरसेवक मदन गायकवाड व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. मयत बारकू भिवसन जाधव (६५) रा. गिगाव, ता. मालेगाव. ह.मु. मांदुर्णे, ता. चाळीसगाव यांना शिर्डी येथील रुग्णालयात एमआरआय करण्यासाठी त्यांच्या पत्नी रेशमाबाई जाधव, दिव्यांग मुलगा प्रकाश जाधव घेऊन गेले होते. उपचारानंतर शिरपूर आगाराच्या बसने (क्र. एमएच २० ३९९३) मालेगावी परतत होते. शहरालगतच्या मनमाड चौफुली ते मोसमपूलदरम्यान जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. अशा स्थितीत जाधव कुटुंबीय हतबल झाले होते. वाहक पी.के. पाटील व चालक विजय सोनवणे यांनी जाधव यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असताना जुना बसस्थानकावर मृतदेह सोडून व त्यांच्याकडून दिलेले तिकीटही हिसकावून शिरपूरकडे पळ काढला.या घटनेची माहिती नगरसेवक मदन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेलार व जाधव यांच्या नातलगांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बसस्थानक प्रमुख व आगारप्रमुख के. बी. धनवटे यांना धारेवर धरले. मानवतेला काळिमा फासणाºया व मृतदेहाची हेळसांड करणाºया वाहक व चालकावर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी शहर पोलिसांनी मध्यस्थी केली तसेच मालेगावचे आगारप्रमुख धनवटे यांनी संबंधित शिरपूर आगाराच्या आगारप्रमुखाशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून कारवाई करावी, असे सांगितले.याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चालक व वाहकावर कारवाईचा प्रस्ताव सादर केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह नातलगांनी ताब्यात घेतला. यानंतर शवविच्छेदनाच्या ठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद किल्ला की शहर पोलीस ठाण्यात करायची यावरूनही वाद झाला. नगरसेवक गायकवाड यांच्यासह कुटुंबीयांनी संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले. या घटनेमुळे लोकसेवकांची मुजोरी समोर आली आहे...केले मृत घोषितबस प्रवासात अत्यवस्थ झालेल्या बारकू जाधव यांना शासकीय किंवा खासगी रुग्णालयात दाखल न करता असंवेदनशील वाहक पी. के. पाटील व चालक विजय सोनवणे यांनी स्वत:च मृत घोषित केल्याचा प्रताप केला.

टॅग्स :Strikeसंप