शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीत गावठी कट्टा बाळगणारे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:53 IST

गावठी पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने कमरेला लावून सफारी कारमधून जाणाऱ्या संशयिताना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. कारचालकाच्या अंगझडतीत जिवंत काडतुसासह पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी कारसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

नाशिक : गावठी पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने कमरेला लावून सफारी कारमधून जाणाऱ्या संशयिताना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. कारचालकाच्या अंगझडतीत जिवंत काडतुसासह पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी कारसह तिघांना ताब्यात घेतले आहे.शनिवारी (दि.११) गुन्हे शाखा युनिट-१चे पथक गस्तीवर होते. यावेळी पोलीस नाईक विशाल काठे यांना एका सफारी कारमधून चौघे गावठी कट्ट्यासह हनुमानवाडी-जुना गंगापूरनाका रस्त्याने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना याबाबत सूचित केले. वाघ यांनी तत्काळ चोपडा लॉन्सजवळच्या पुलालगत टी-पॉइंटवर सापळा रचला. यावेळी रामवाडीकडून एक सफारी कार (एमएच४३ एक्यू २७७२) येताना दिसली. पथकाने कारला थांबविले. कारचालक तनीश कैलास गुप्ता (रा. कपालेश्वर मंदिराजवळ, पंचवटी) याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी एक पिस्तूलसह मॅगेझिनमध्ये जिवंत काडतूस असा एकूण ४० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल व नऊ लाख रुपयांची सफारी कार जप्त केली आहे. तनिशसह साथीदार मनाल खुशाल शिंदे (रा. वक्र तुंड अपार्टमेंट, म्हसरूळ), मोहन गणेश घुगे (रा. हिरावाडी, पंचवटी) या तिघांना अटक केली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी