शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे शाखा युनीट-१ : मोटारीत गावठी कट्टा बाळगणारे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 18:58 IST

यावेळी रामवाडीकडून मिळालेल्या माहितीतील वर्णनानुसार एक सफारी कार (एम.एच४३ एक्यू२७७२) संशयास्पदरित्या येथील पेट्रोलपंपाजवळून येताना दिसली. यावेळी सापळा रचलेल्या पथकाने कारला थांबविले

नाशिक : गावठी पिस्तुल विक्रीच्या उद्देशाने कमरेला लावून सफारी कारमधून जाणाऱ्या संशयितांना गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. कारच्या चालकाच्या अंगझडतीत जीवंत काडतुसासह पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी कारसह त्यास व त्याच्या तीघा साथीदारांना ताब्यात घेतले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी (दि.११) नेहमीप्रमाणे गुन्हे शाखा युनीट-१चे पथक गस्तीवर होते. यावेळी पोलीस नाईक विशाल काठे यांना एका एका सफारी कारमधून चौघे गावठी कट्ट्यासह हनुमानवाडी-जुना गंगापूरनाका रस्त्याने जाणार असल्याची खात्रिशीर माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांना याबाबत सुचित केले. वाघ यांनी तत्काळ चोपडा लॉन्सजवळच्या पूलालगत टी-पॉइंटवर सापळा रचला. यावेळी रामवाडीकडून मिळालेल्या माहितीतील वर्णनानुसार एक सफारी कार (एम.एच४३ एक्यू२७७२) संशयास्पदरित्या येथील पेट्रोलपंपाजवळून येताना दिसली. यावेळी सापळा रचलेल्या पथकाने कारला थांबविले. यावेळी कारचालक तनिश कैलास गुप्ता (रा.कपालेश्वर मंदिराजवळ, पंचवटी) याची अंगझडती पोलिसांनी घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तुल व एक मॅगेझिनमध्ये जीवंत काडतूस असा एकूण ४० हजार ५०० रु पये किंमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली ९ लाख रूपयांची सफारी क ार जप्त केली आहे. तसेच तनिशसह त्याच्यासोबत असलेले साथीदार मनाल खुशाल शिंदे (रा. वक्रतुंड अपार्टमेंट, म्हसरूळ), मोहन गणेश घुगे (रा. महाराष्टÑ कॉलनी, हिरावाडी, पंचवटी) या तीघांना अटक केली. त्यांच्याविरूध्द पंचवटी पोलीस ठाण्यात विनापरवाना शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरिक्षक बलराम पालकर, पोपट कारवाळ, हवालदार रवींद्र बागुल, संजय मुळक, नाझीम पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय