शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

कार पळविली : इंदिरानगरला व्यावसायिकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 15:50 IST

संशयित हल्लेखोरांनी गॅरेजमधील वर्णा कार चोरी करण्याच्या उद्देशाने रामचंद्र यांच्यावर हल्ला केला असावा असा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देमारेकऱ्यांनी डोक्यावर केला गजाने प्रहारकारचोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचा संशय

इंदिरानगर : वडाळा पाथर्डी रस्त्यावरील मेट्रो झोनच्या समोर असलेल्या श्रीजी प्लाझा अपार्टमेंटशेजारी असलेल्या श्री गुरुकृपा गॅरेजचे चालक रामचंद्र रामपराग निसाद (४०, मुळ राह. उत्तरप्रदेश) यांच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रहार करत रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ठार मारल्याची घटना गुरुवारी (दि.१२) सकाळी उघडकीस आली.

मारेकऱ्यांनी गॅरेजमधून एक वर्णा कारसुध्दा पळवून नेली आहे.इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील मागील वीस दिवसांत खूनाची ही दुसरी घटना घडली आहे. यापुर्वी पाथर्डीफाटा येथे पतीने पत्नीला गळा आवळून ठार मारल्याचे उघडकीस आले होते. या गुन्ह्याचा तपास पुर्ण होत नाही, तोच पुन्हा खूनाची दुसरी घटना ऐन दीपावलीच्या तोंडावर घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. श्री गुरुकृपा गॅरेज असुन त्या ठिकाणी चारचाकी वाहने दुरुस्ती व वॉशिंग करण्यात येते. गुरुवार (दि.१२) रोजी नेहमीप्रमाणे सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास आकाश पवार गॅरेजमध्ये कामासाठी आला असता चार चाकी वाहने वॉश करण्याच्या रॅम्पवर फुटलेल्या अवस्थेत मोबाइल आढळून आला तेथून काही अंतरावरगॅरेज चालक रामचन्‍द्र यांचे डोक्यावर गंभीर जखमा झालेल्या व मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्याने तातडीने गॅरेजचे भागीदार तंबी व शेजारील दुकानदारांना आणि इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करुन मृतदेहाचा कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्यास सांगून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला. याप्रकरणी त्यांचे व्यावसायिक भागीदार मुरुवान तंबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारचोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचा संशयसंशयित हल्लेखोरांनी गॅरेजमधील वर्णा कार चोरी करण्याच्या उद्देशाने रामचंद्र यांच्यावर हल्ला केला असावा असा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. संशयितांच्या शोधासाठी शहरातील रस्त्यावरील आणि शहराबाहेर जाणाऱ्या टोलनाक्यावरील सीसी टीव्हीचे फुटेज तपासण्यात येत सल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Murderखूनnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय