नाशिक : बारावीनंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी चौथा कॅप राउंडच्या प्रक्रियेला सोमवारपासून (दि.२५) सुरुवात होत आहे. या राउंडची अलॉटमेंट यादी ३० जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. गेल्या २ जूनपासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत एकूण तीन कॅप राउंड झाले असून, तिसऱ्या कॅप राउंडची अलॉटमेंट यादी १४ जुलै रोजी जाहीर झाली. त्यानंतर १८ तारखेपर्यंत या कॅप राउंडची प्रवेशप्रक्रिया सुरू होती. दरम्यान, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने प्रवेशप्रक्रियेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता चौथ्या कॅप राउंडसाठी रिक्त जागांची माहिती सोमवारी (दि.२५) जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर आधीच्या तीन राउंडमध्ये महाविद्यालय न मिळालेल्या, कॅपच्या पहिल्या राउंडमध्ये सहभागी न झालेल्या, यापूर्वीच्या कॅप राउंडमध्ये प्रवेश रद्द केलेल्या व अन्य पद्धतीनुसार चौथ्या कॅप राउंडमध्ये पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा आॅनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. येत्या २६ ते २८ जुलैपर्यंत आॅप्शन फॉर्म भरण्याची मुदत असून, त्यानंतर ३० जुलै रोजी कॅप राउंडची अलॉटमेंट यादी जाहीर होणार आहे.
अभियांत्रिकीसाठी आज कॅप राउंड
By admin | Updated: July 24, 2016 23:48 IST