शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

...अखेर गांजा तस्कर गोट्याला ठोकल्या बेड्या; पाच दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:41 IST

मुख्य सुत्रधारांपैकी फरार असलेल्या गोट्याच्या मागावर पोलीस होते; मात्र तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता.

ठळक मुद्देवर्षभरापासून पोलीस मागावर

नाशिक : वर्षभरापासून फरार असलेला गांजा तस्कर गोट्याला गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने तलाठी कॉलनी येथे सापळा रचून शिताफीने बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुध्द आडगाव पोलीस ठाण्यात अंमली पदार्थाची तपोवनातुन वाहतुक केल्याप्रकरणी मागील वर्षी सप्टेंबर महिन्याता गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या गुन्ह्यात पोलिसांना गोट्या हवा होता.तपोवनातून १० सप्टेंबर २०१९ साली गांजाची होणारी तस्करी पोलिसांनी रोखली होती. जयेश भाबड (रा.नाशिकरोड) व अमर बोरसे ऊर्फ गोट्या (रा.तारवालानगर) यांच्या मालकीचा गांजा वाहून नेला जात असल्याची माहिती त्यावेळी अटक केलेल्या प्रशांत गोविंद नारळे, युवराज गजेंद्र मोहिते, धनराज शिवाजी पवार यांनी पोलिसांना दिली होती. हे तीघे मारुती स्विफ्ट कारमधून अवैधरित्या ५ लाख १६ हजार रुपये किंमतीचा ६५ किलो इतका गांजा वाहतुक करताना पोलिसांना आढळून आले होते. या गुन्ह्यात मुख्य सुत्रधारांपैकी फरार असलेल्या गोट्याच्या मागावर पोलीस होते; मात्र तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता.उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी जुन्या यादीवर सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश गुन्हे शाखांना दिल्यानंतर युनीट-१चे शिपाई राहुल पालखेडे यांना गोट्याबाबत गुप्त माहिती मिळाली. यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ, सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी, संजय मुळक, विशाल काठे आदींनी तलाठी कॉलनी परिसरात सापळा रचला. येथील ५३ क्रमांकाच्या बंगल्यात वास्तव्यास असलेला अमर ऊर्फ गोट्या प्रकाश बोरसे (५३) यास पोलिासांनी अटक केली. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत (दि.२४) पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक