शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदासाठी ‘एकता’च्या दुसऱ्या गटाकडूनही उमेदवार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:22 IST

अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एकता पॅनलच्या वतीने माजी अध्यक्षांची बैठक बोलावून नूतन अध्यक्षांचे नाव जाहीर केल्याने एकताच्याच दुसºया गटाच्या पदाधिकाºयांना विश्वासात न घेतल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

सिडको : अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एकता पॅनलच्या वतीने माजी अध्यक्षांची बैठक बोलावून नूतन अध्यक्षांचे नाव जाहीर केल्याने एकताच्याच दुसºया गटाच्या पदाधिकाºयांना विश्वासात न घेतल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. दुसºया गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी मागील निवडणुकीत आपल्याला अध्यक्षपदाचा दिलेला शब्द पाळला गेला नसल्याचा आक्षेप घेत रविवारी (दि. ६) आयमाच्या संस्थापक अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक घेतल्याचे वृत्त असून, या बैठकीत शब्द पाळण्यात यावा याबाबत सविस्तर चर्चा झाली. आयमाच्या अध्यक्ष व इतर पदाधिकाºयांचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपुष्टात येत असून, नव्या पदाधिकाºयांची निवडणूकप्रक्रिया घोषित झाली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी एकता पॅनलने दुसºया गटाच्या उमेदवारांना विश्वासात न घेता नवीन अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून वरुण तलवार यांचे नाव घोषित केल्याने दुसºया गटामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे आता दुसºया गटाच्या पॅनलकडूनही व्यूहरचना आखण्यास सुरुवात झाली असून, या गटाची नुकतीच रविवारी (दि. ६) आयमाचे संस्थापक अध्यक्ष भास्कर कोतवाल, शशिकांत कोतवाल, मार्गदर्शक सुनील बागुल, माजी अध्यक्ष रमेश वैश्य, संजीव नारंग, विवेक पाटील, जे. जी. शिर्के, जी. आर. वाघ, एन. टी. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.  या बैठकीत अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले उमेदवार तुषार चव्हाण यांनी मागील निवडणुकीच्या वेळी मला अध्यक्षपदाचा शब्द दिला असताना आता तो पाळला जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली असून, यामुळे निवडणुकीत अध्यक्षपदासाठी चव्हाण हे दावेदारी आणि उमेदवारी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.बिनविरोधच्या हालचालीअनेक वर्षे ही निवडणूक सर्वसंमतीने आणि वरिष्ठांच्या मध्यस्थीने बिनविरोध करण्याची परंपरा असून, यंदादेखील ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र दुसरीकडे अध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ असल्याची चर्चा आहे. गेल्यावर्षी अध्यक्षपदासाठी राजेंद्र अहिरे यांना संधी देण्यात आली त्यावेळी आयमामधील वरिष्ठांनी तडजोड करीत दुसºया गटाचे उमेदवार तुषार चव्हाण यांना पुढीलवेळी अध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता, असे त्यांचे समर्थक सांगतात. हा शब्द पाळला न गेल्यास यंदा मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक