सातपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत गेल्या पंधरा दिवसांत जवळपास सर्वच उमेदवारांनी हायटेक प्रचार केला. मोठमोठ्या प्रचार फेऱ्या काढून शक्ती प्रदर्शन केले. मात्र या सर्व बाबींवर खर्च करण्यास फारच कंजुशी केल्याचे स्पष्ट झाले आहे. सातपूर विभागातील एकूण १२६ मातब्बर उमेदवारांपैकी अवघ्या चार उमेदवारांचा खर्च दोन लाखांवर झाला आहे.महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत सातपूर विभागातील चार प्रभागात १६ जागांसाठी १२६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवाराला निवडणूक कार्यालयात खर्च सादर करावा लागला आहे. प्रचाराच्या काळात जवळपास सर्वच उमेदवारांनी हायटेक प्रचार यंत्रणा राबविली आहे. वाहनांना ध्वनिक्षेपक यंत्रणा लावून प्रचार केला. मोठमोठ्या प्रचार फेऱ्या काढल्या होत्या. प्रचारात कोणताही उमेदवार मागे राहिला नाही. मात्र खर्च करण्यात फारच कंजुषी केली आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चावरून स्पष्ट होत आहे. मातब्बर आणि धनाढ्य उमेदवारांपेक्षा अन्य उमेदवारांचा खर्च अधिक झाला आहे. ़़मतदानाच्या (दि.२१ पर्यंत) दिवसापर्यंत उमेदवारांनी सादर केलेला खर्च पाहता प्रभाग क्र .८ मध्ये शिवसेनेच्या नयना गांगुर्डे १ लाख २६ हजार ३५२ रु पये, अपक्ष माजी नगरसेवक उषा बेंडकोळी ९२ हजार ७१४ रु पये, भाजपाचे अशोक जाधव २ लाख २ हजार ८३६ रु पये, नगरसेवक शिवसेनेचे उमेदवार विलास शिंदे २ लाख ४९ हजार ९४८ रु पये, प्रभाग क्र .९ मध्ये नगरसेवक भाजपाचे दिनकर पाटील २ लाख ७९ हजार ७१३ रु पये, भाजपाचे उमेदवार हेमलता कांडेकर १ लाख ६१ हजार ५८५ रु पये, भाजपाचे उमेदवार वर्षा भालेराव १ लाख ४५ हजार ८०९ रु पये, प्रभाग क्र .१० मध्ये मनसेच्या फरिदा शेख १ लाख २५ हजार ७२१ रु पये, भाजपाच्या पल्लवी पाटील १ लाख ६४ हजार रु पये, नगरसेवक शशिकांत जाधव १ लाख ३४ हजार ६१४ रु पये, शिवसेनेचे गोकूळ नागरे १ लाख २२ हजार ७१९ रु पये, प्रभाग क्र . ११ मधील शिवसेनेचे रूपाली गांगुर्डे ६४ हजार रु पये, मनसेचे योगेश शेवरे १ लाख ३३ हजार २७३ रु पये, विद्यमान नगरसेवक सलीम शेख यांचा खर्चदेखील दोन लाखांच्या आसपास झाला आहे. शिवसेनेचे दीपक मौले २ लाख ११ हजार ८६३ रु पये खर्च झाल्याचे त्यांनी सादर केलेल्या खर्चावरून स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)
उमेदवारांनी घेतला हात आखडता
By admin | Updated: February 26, 2017 00:11 IST