लासलगाव : येथे घराचा दरवाजा उघडून ६१ हजार रु पये किमतीच्या कॅमेºयाची चोरी झाली. येथील ज्येष्ठ फोटोग्राफर मजीद पठाण यांच्या आशीर्वादनगर येथील घरातून गुरु वारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ६१ हजार रु पये किमतीचे तीन कॅमेरे चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, चोरीच्या घटनेचा तपास पोलीस करीत आहे. या घटनेमुळे लासलगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील आशीर्वादनगरमध्ये फिर्यादी सुलतान खान मजीद खान पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सहा वाजेच्या दरम्यान फिर्यादीचे वडील मजीद पठाण रोज सकाळी फिरायला जातात. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून घरात ठेवलेले दोन व्हिडीओ कॅमेऱ्यांमध्ये पॅनासॉनिक कंपनीचा व सोनी कंपनीचा हॅँडीकॅम व्हिडीओ कॅमेरा व एक निकॉन कंपनीचा कॅमेरा बॅगसह उचलून पोबारा केला. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करीत चोरट्यांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांना कळवून संपूर्ण जिल्ह्यात माहिती दिली; मात्र हाती काहीच न लागल्यामुळे सीसीटीव्हीत चोरीची घटना कैद झाल्याने या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत लासलगाव पोलिसांनी या चोरांचा शोध सुरू केला आहे.
लासलगाव येथून कॅमेऱ्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 16:38 IST