नांदूरवैद्य : लोहशिंगवे शिवारातील जुंद्रे मळा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे एक गाय व एक गायीच्या बछड्याला आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटनेने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या शिवारात बिबट्याने दोन दिवसात दोन हल्ले केल्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहे.वनविभागाकडे वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करून देखील वनविभागाने टाळाटाळ केली होती.अखेर आज वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या घटनेचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यामुळे वनविभागाला अखेर उशिरा का होईना पण जाग आल्यामुळे सदर घटनेच्या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी पाटील यांच्यासह कर्मचारी यांनी भेट देऊन सरपंच संतोष जुंद्रे यांना विचारपूस करून बिबट्याचा वावर असणा-या ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने अखेर पिंजरा लावण्यात आला आहे. देवळाली येथील जीवन गायकवाड व सरपंच संतोष जुंद्रे यांनी वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली होती.
बिबट्यासाठी वनविभागाकडून पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:29 IST